हरियाणा – हरियाणा (Hariyana) करनाल (Karnaal) मधून 4 संशयित दहशतवाद्यांना पोलिसांनी (Police) ताब्यात घेतलं आहे. तसेच चार जणांकडून पोलिसांनी हत्यार हस्तगत केली आहेत. ते पंजाबमधून दिल्लीत प्रवास करत होते. त्यांना संशयित दहशतवादी म्हणून ताब्यात घेतलं आहे. हरियाणातील करनालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळ्यांसह अनेक स्फोटक वस्तू मिळाल्याची प्राथमिक माहिती समजली आहे. विशेष म्हणजे पोलिसांनी ताब्यात घेतलेली एक पावडर आरडीएक्स असू शकते अशी शंका आहे.
Haryana | Karnal Police detains four terror suspects, recovers a large cache of explosives
Details awaited. pic.twitter.com/4p06SH67tf
— ANI (@ANI) May 5, 2022
हरियाणातील करनालमध्ये पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. येथून चार संशयितांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि गनपावडरचे कंटेनर मिळाल्याची चर्चा आहे. ही गनपावडर आरडीएक्स असू शकते, अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यांच्याकडे एवढ्या गोळ्या आणि गनपावडर मिळाले आहेत की, ताब्यात घेतलेल्या चौघांनी मोठी दुर्घटना घडवून आणली असती. हे चौघेही पंजाबस्थित दहशतवादी संघटना बब्बर खालसा इंटरनॅशनल (BKI) शी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पकडण्यासाठी आयबी पंजाब पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्त कारवाई केली केली आहे.
पकडलेल्या चार संशयित दहशतवाद्यांचे वय सुमारे 20-25 वर्षे आहे. चारही संशयित पंजाबमधून महाराष्ट्रातील नांदेडला जात होते. हे लोक हरविंदर सिंग उर्फ रिंडा यांच्याशी संबंधित असल्याचे सांगण्यात येत आहे. रिंडा हा वॉन्टेड दहशतवादी असून तो सध्या पाकिस्तानात लपला आहे. कर्नाल येथील बस्तारा टोलनाक्यावरून एक इनोव्हा वाहन पोलिसांच्या पथकाने पकडली त्यावेळी चार जणांना ताब्यात घेतले आहे. सध्या ही गाडी मधुबन पोलीस ठाण्यात उभी आहे. तेथे बॉम्बशोधक पथक आहे. वरिष्ठ अधिकारीही तेथे पोहोचले आहेत. संशयित दहशतवाद्यांकडून शस्त्रे, मोठ्या प्रमाणात गोळ्या आणि गनपावडरचे कंटेनर जप्त करण्यात आले आहेत.