Chandrashekhar Guruji : कंत्राटदार ते वास्तु विशारद, कोण आहेत चंद्रशेखर गुरुजी ? वाचा त्यांच्या रंजक प्रवासाविषयी
कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करत असताना त्यांनी पाहिले बरीच चुकीच्या पद्धतीने बनवली गेली आहेत. वास्तुचा अभ्यास करण्यासाठी ते सिंगापूरला गेले. वास्तुचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर पुन्हा मुंबईत आले आणि वास्तुचे काम सुरु केले.
कर्नाटक : ‘सरल वास्तू’चे चंद्रशेखर गुरुजी (Chandrashekhar Guruji) यांची आज दुपारी चाकूने भोसकून हत्या (Murder) करण्यात आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. त्यांच्या अनुयायांच्या रुपात आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांची हत्या का केली. दरम्यान, ही हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे हे अद्याप उघड झाले नाही. सीसीटीव्ही (CCTV)च्या आधारे पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. तसेच आरोपींच्या शोधासाठी श्वान पथकाचीही मदत घेतली जात आहे. गुरुजींच्या कुटुंबातील एका मुलाचा तीन दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. त्यानिमित्तानेच ते हुबळी येथे आल्याचे कळते. मात्र ते हॉटेलमध्ये नेमके कोणत्या कारणासाठी आले होते, याचा पोलीस तपास करीत आहेत
कोण आहेत चंद्रशेखर गुरुजी ?
चंद्रशेखर गुरुजींचा जन्म कर्नाटकातील बगलकोट जिल्ह्यात झाला आहे. लहानपणापासूनच त्यांना समाजसेवेची आवड असल्याने त्यांचे झुकते देशसेवेकडे होते. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांना सैन्यात जाण्याची इच्छा होती. मात्र त्यासाठी आवश्यक निकष पूर्ण न केल्याने त्यांची निवड झाली नाही. त्यानंतर त्यांनी समाजसेवेत पाऊल टाकले. सिविल इंजिनियरिंगमध्ये पदवी घेतल्यानंतर ते 1989 मध्ये मुंबईत आले. मुंबईत आल्यानंतर त्यांनी सुरवातीला कन्स्ट्रक्शन कंपनीत काम सुरु केले आणि नंतर स्वतःची कंपनी स्थापन केली. कंपनीचे कामकाज चांगले सुरु होते. मात्र 1999 नंतर त्यांना बऱ्याच आव्हानांचा सामना करावा लागला. त्यानंतर त्यांनी व्यवसायातून बाहेर पडत त्यांनी वास्तुशी संबंधित काम करण्यास सुरवात केली. कंस्ट्रक्शनचा व्यवसाय करत असताना त्यांनी पाहिले बरीच चुकीच्या पद्धतीने बनवली गेली आहेत. वास्तुचा अभ्यास करण्यासाठी ते सिंगापूरला गेले. वास्तुचा अभ्यास पूर्ण केल्यानंतर पुन्हा मुंबईत आले आणि वास्तुचे काम सुरु केले. (From Contractor to Architect, know about Chandrasekhar Gurujis Life Journey)