नवी दिल्ली: भारताच्या स्वातंत्र्योत्तर काळात पहिल्यांदाच एखाद्या महिलेला फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. तिचे नाव शबनम (First Indian Woman to be Executed) असे आहे. मथुरेतील तुरुंगात तिला लवकरच फाशी देण्यात येईल. त्यामुळे सध्या फाशीची शिक्षा झालेली शबनम आहे तरी कोण, अशी चर्चा रंगली आहे. शबनम ही मूळची अमरोहाची आहे. मेरठमधील जल्लाद पवन तिला फास देताना खटका ओढेल. शबनमच्या फाशीची तारीख अद्याप निश्चित नसली तरी कोणत्याही क्षणी तिच्या शिक्षेची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे. (Shabnam first Indian women sentenced death penalty)
भारतात फाशीची शिक्षा होणे, ही खूपच गंभीर बाब मानला जाते. आतापर्यंत बॉम्बस्फोट, दहशतवादी हल्ला यासारख्या कटातील गुन्हेगारांनाच फाशी देण्यात आली आहे. मात्र, शबनम ही स्वातंत्र्योत्तर काळात फाशीची शिक्षा देण्यात येणारी पहिली महिला ठरणार आहे.
2008 साली शबनमने आपल्या प्रियकराच्या मदतीने सात नातेवाईकांची कुऱ्हाडीचे घाव घालून निर्दयीपणे हत्या केली होती. यामध्ये 10 महिन्यांच्या बाळाचाही समावेश होता. शबनम हिने कुऱ्हाडीने या सातही जणांचे शीर धडावेगळे केले. तिचा हा क्रूरपणा पाहून सर्वोच्च न्यायालयानेही शबनमची फाशीची शिक्षा माफ करण्यास नकार दिला होता.
उत्तर प्रदेशात महिलांना फाशी देण्यासाठी केवळ एकच वधस्तंभ आहे. हे ठिकाण मथुरेत आहे. शबनमला फाशी देण्यासाठी औपचारिक प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे फाशीची तारीख अद्याप निश्चित होऊ शकलेली नाही. मात्र, डेथ वॉरंट जाहीर झाल्यानंतर शबनमला लगेच फाशी दिली जाईल, अशी माहिती वरिष्ठ तुरुंग अधीक्षक शैलेंद्र कुमार मैत्रेय यांनी दिली.
अमरोहा येथे राहणाऱ्या शबनमच्या कुटुंबात तिचे वडील, आई, भाऊ, त्याची पत्नी आणि त्यांचे महिन्यांचे बाळ यांचा समावेश होता. शबनम गावातील सलीम नावाच्या तरुणाच्या प्रेमात पडली होती. मात्र, हे संबंध तिच्या वडिलांना मान्य नव्हते. त्यामुळे घरच्यांनी शबनमला सलीमशी संबंध तोडायला सांगितले.
सुरुवातीच्या काळात सलीमला भेटता यावे म्हणून शबनम आपल्या घरच्यांना झोपेच्या गोळ्या देत होती. घरचे लोक गाढ झोपल्यावर सलीम आणि शबनम घराच्या छतावर एकमेकांना भेटत. मात्र, थोड्याच दिवसांमध्ये या दोघांनी घरच्यांना ठार मारण्याचा धक्कादायक निर्णय घेतला.
14 एप्रिल 2008 च्या रात्री शबनमने सलीमला घरी बोलावले. त्यावेळी शबनमचे कुटुंबीय झोपेच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गाढ झोपले होते. शबनम आणि सलीमने झोपेतच या सगळ्यांवर कुऱ्हाडीचे घाव घातले. यावेळी शबनमची एक लांबची बहीण राबिया हीदेखील त्यांच्या घरी आली होती. शबनमने तिलाहा ठार मारले. एवढेच नव्हे तर अवघ्या 10 महिन्यांच्या अर्श या बाळालाही शबनमने सोडले नाही. तिने कुऱ्डाडीचा घाव घालून या बाळाचे मुंडके छाटले.
(Shabnam first Indian women sentenced death penalty)