Marathi News National Funeral of Sidhu Musewala: Father removes turban, emotional call and much more
Sidhu Moosewala last rites:सिद्धू मुसेवालांचा अंत्यसंस्कार: वडिलांनी काढली पगडी, भावनिक साद आणि बरचं काही
सिद्धू मुसेवाला यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी मुसा येथे झाला. चाहते आणि कुटुंबातील सदस्यांनी ओल्या डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. संपूर्ण कुटुंबासाठी ही दुःखाची वेळ आहे.
पंजाबी गायक काँग्रेस नेते सिद्धू मूसेवालाImage Credit source: tv9
मुसा (पंजाब) : पंजाबी गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मूसेवाला (Punjabi Singer and Congress Leader Sidhu Musewala) यांची 29 मे रोजी हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आज दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार (Funeral) करण्यात आले. यादरम्यान, सोशल मीडियावर एक अतिशय भावनिक व्हिडिओ व्हायरल (Emotional Video Viral) होत आहे. ज्यामध्ये दिवंगत गायक मुसेवाला यांचे वडील आपली पगडी काढताना आणि सर्वांसमोर रडताना दिसत आहेत. तसेच ते रडत माझा मुलगा कोणीतरी परत आणून द्या… मी माझी पगडी आपल्यासमोर करतोय कदाचित ते अशीच भावनिक साद तर घातल नसतील. तर याच व्हिडिओ दिवंगत गायक मुसेवाला यांची आई आपल्या मुलाला शेवटची पगडी घालता यावी म्हणून त्याचे केस बनवताना दिसत आहे. जे दृश्य अंगावर काटा आणणारे आणि डोळ्यांच्या कडा ओल्या करणारे आहे.
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांचा मृत्यू सर्वांनाच धक्कादायक होता. 28 वर्षीय मुलाचा निरोप घेताना आई-वडील दोघांचीही वाईट स्थिती होती. दोघेही यावेळी शॉकमध्ये आहेत. सिद्धू मुसेवाला यांच्या निधनाने त्यांचे जवळचे मित्र आणि चाहत्यांना देखिल धक्का बसला आहे. त्यांच्या जाण्याने संपूर्ण बॉलिवूड-पंजाबी इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. सिद्धू मुसेवाला आता या जगात नाहीत ते आपल्यात नाहीत यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
कपाळाचे शेवटचे चुंबन
सिद्धू मुसेवालाच्या जाण्याने आई आणि वडिलांचे काय झाले असेल याचा अंदाज बांधणे कठीण आहे. शेवटच्या निरोपाच्या आधीही मुसेवालाचे वडील मुलाच्या कपाळाचे चुंबन घेताना, मिशा पिळताना दिसले. मुसेवालांकडे त्यांची आई बघतच राहिली. ज्या आईला आपल्या जीवंतपणी मुलाच्या डोक्यावर बाशिंग बघायचे होते. तोच मुलगा आज कफनात गुंडाळलेला दिसत असल्याने काय झाले असेल त्या माऊलीचे असाच प्रश्न सगळ्यांना पडत आहे. तर ज्या अभिमानाने मासेवाला यांनी आयुष्याची 28 वर्षे जगले. त्याच अभिमानाने त्यांना संपूर्ण गावाने अलविदा म्हटले आहे. लाल फेटा बांधून सिद्धूला वरासारखं सजवण्यात आलं होतं.
सिद्धू मुसेवाला यांचा अंत्यसंस्कार त्यांच्या मूळ गावी मुसा येथे झाला. चाहते आणि कुटुंबातील सदस्यांनी ओल्या डोळ्यांनी त्यांना अखेरचा निरोप दिला. संपूर्ण कुटुंबासाठी ही दुःखाची वेळ आहे. पंजाब पोलिसांनी सांगितले की, सिद्धू मुसेवाला यांच्यावर 30 राऊंड गोळीबार करण्यात आला. पोस्टमॉर्टममध्ये सिद्धूच्या शरीरावर 24 गोळ्यांच्या जखमा असल्याचंही समोर आलं आहे. तर त्यांच्या डोक्यात एक गोळी अडकली होती. शरीराच्या इतर भागातही अंतर्गत जखमा होत्या.
ट्रॅक्टर फुलांनी सजवण्यात आला होता
सिद्धूचे पेपरचे नाव शुभदीप सिंग आहे. मात्र बाहेरच्या जगात ते त्यांच्या घराच्या आणि गावाच्या ‘सिद्धू मुसेवाला’या नावाने प्रसिद्ध होते. सिद्धू मुसेवाला यांना त्यांचा ट्रॅक्टर 5911 खूप आवडला. त्यावर त्यांची अखेरची यात्रा काढण्यात आली. ट्रॅक्टर फुलांनी सजवण्यात आला होता. यासोबतच त्याच्या मिशीवर हात मारणारा पोस्टरही लावण्यात आला होता. त्यावर पंजाबी भाषेत लिहिले होते, “दुसरा कोणी नाही.” याशिवाय सिद्धू मुसेवाला यांनाही बंदुकांची आवड होती. त्याच्या आवडत्या ट्रॅक्टरमध्ये स्टीलपासून बनवलेल्या AK 47 चा आकार ठेवला होता. हे सर्व पाहून मूसेवालाचे सर्व चाहते भावूक झाले.