Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

G-20 New Delhi Summit 2023 : G-20 परिषदेचा समारोप; अध्यक्षपद ब्राझीलकडे सुपूर्द; वाचा सविस्तर…

G-20 New Delhi Summit 2023 : भेटीगाठी, डिनर डिप्लोमसी, जागतिक प्रश्नांवर चर्चा अन् बरंच काही... G-20 परिषदेत दोन दिवसात नेमकं काय-काय घडलं? भारत मंडपममध्ये कोणत्या मुद्द्यावंर चर्चा? वाचा सविस्तर...

G-20 New Delhi Summit 2023 : G-20 परिषदेचा समारोप; अध्यक्षपद ब्राझीलकडे सुपूर्द; वाचा सविस्तर...
Follow us
| Updated on: Sep 10, 2023 | 5:09 PM

G-20 New Delhi Summit 2023 : दोन दिवसांपासून राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या G-20 शिखर परिषदेचा आज समारोप झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण करत या कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी त्यांनी येत्या 2024 या वर्षाकरिता अध्यक्षपद ब्राझीलकडेही सोपावलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांच्याकडे G-20 चं अध्यक्षपद सोपवलं आहे.  G-20 समुहांच्या अध्यक्षतेचं प्रतिक असणारं गेवल (हातोडा) त्यांच्याकडे सोपवण्यात आला. दोन दिवसांपासून सुरु असलेल्या या जागतिक परिषदेचा आज समारोप झाला. या परिषदेत अनेक मुद्दे चर्चिले गेले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर याबाबतची माहिती दिली आहे. भारताने ब्राझीलला गेवल दिलं. आम्हाला पूर्ण विश्वास आहे की, ब्राझील हे अध्यक्षपद समर्थपणे सांभाळेल. G-20 ची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी एक पाऊल पुढे जातील. आम्हीही या काळात जी मदत लागेल ती करण्याचा प्रयत्न करू, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. ब्राझीलचे राष्ट्रपती लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांनीही आपलं मत मांडलं. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचं मोठं योगदान असल्याचं ते म्हणाले. G20 च्या या परिषदेतच्या समारोपात पंतप्रधानो मोदी यांनी ब्राझीलला आगामी काळातील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

ब्राझील आता येत्या काळात G20 संघटनेचा अध्यक्षपद सांभाळणार आहे. लुइज इनासियो लूला डी सिल्वा यांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या प्रयत्नांसाठी भारताचे आभार मानले. तसंच येत्या काळात G20 संघटनेच्या कार्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा विश्वास दिला.

काल सकाळी साडे नऊ वाजता या शिखर परिषदेला सुरुनात झाली. भारत मंडपममध्ये या नेत्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली. समिट हॉलमध्ये ‘वन अर्थ’वर पहिलं सत्र पार पडलं. तर काल दुपारी ‘वन फॅमिली’वर दुसरं सत्र संपन्न झालं. तर आज राजघाटावर जात या नेत्यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतींना अभिवादन केलं आणि दुपारी ‘वन फ्यूचर’वर तिसरं सत्र पार पडलं. सगळ्यात शेवटी गेवल ब्राझीलकडे सूपूर्द करत या परिषदेची सांगता झाली.