G-20 Summit : जी 20 परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज; परदेशी पाहुण्यांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल, पाहा…

| Updated on: Sep 07, 2023 | 10:46 PM

G-20 Summit : G-20 परिषदेसाठी राजधानी दिल्लीत जगभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. या परदेशी पाहुण्यासाठी खास सोय करण्यात आली आहे. या परदेशी पाहुण्यांसाठी काय असणार स्पेशल बेत? पाहा, 'त्या' हॉटेलमधील खास व्हीडिओ...

G-20 Summit : जी 20 परिषदेसाठी राजधानी दिल्ली सज्ज; परदेशी पाहुण्यांसाठी खाद्यपदार्थांची रेलचेल, पाहा...
Follow us on

नवी दिल्ली | 07 सप्टेंबर 2023 : राजधानी दिल्लीत जगभरातील महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 9 सप्टेंबर आणि 10 सप्टेंबर या दोन दिवशी G-20 परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. G-20 परिषदेनिमित्त राजधानी दिल्लीत कडेकोट बंदोबस्त करण्यात आला आहे. G-20 परिषदेच्या निमित्त येणाऱ्या या पाहुण्यांसाठी खास सोय करण्यात आली आहे. जेवणाचाही खास बेत करण्यात आला आहे. ज्या हॉटेलमध्ये या पाहुण्यांची राहण्याची सोय करण्यात आली आहे. त्याच हॉटेलमध्ये त्यांच्या जेवणासाठीही विशेष मेन्यू बनवण्यात आला आहे. खास भारतीय पदार्थांची या पाहुण्यासाठी मेजवानी असणार आहे.

G-20 परिषदेसाठी येणाऱ्या या नेत्यांसाठी खास भारतीय पदार्थांची रेलचेल असणार आहे. यात विशेष नॉर्थ ईस्ट भागातील मेन्यू असणार आहे. चिकन करी थोडसं तिखट अशी टायगर चिली, जी ईशान्य भारतात प्रसिद्ध आहे.वेगवेगळे सूप्स पण जेवणाच्या मेन्यूमध्ये ठेवण्यात येणार आहेत. G-20 परिषदेसाठी येणाऱ्या नेत्यांना सोन्याच्या आणि चांदीच्या भांड्यामध्ये जेवण वाढण्यात येणार आहे. आईआरआईएस इंडियाचे सीईओ राजीव पाबुवाल यांनी ही माहिती दिली आहे.

विविध देशांचे पंतप्रधान आणि राष्ट्राध्यक्ष नवी दिल्लीत येणार असल्याने विशेष तयारी करण्यात आली आहे. यावेळी पाहुणचारासाठी 150 हून अधिक अलिशान गाड्या असणार आहेत. 300 विशेष गाड्यांचंही बुकिंग करण्यात आलं आहे. पुढच्या सहा दिवसांसाठी ही खास सोय करण्यात आली आहे. राजधानी दिल्ली बाहेरील राज्यांमधूनही गाड्या मागवण्यात आल्या आहेत. जेने करून आलेल्या पाहुण्यांची गैरसोय होणार नाही. त्यांना उचित पाहुणाचार मिळेल.

G-20 परिषदेला कोण कोण हजर राहणार?

G-20 परिषदेला जगभरातील विविध देशांचे पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक. फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्हानीज, कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो, जर्मनीचे चान्सलर ओलाफ स्कोल्झ, जपानचे पंतप्रधान फुमियो किशीदा, दक्षिण कोरियाचे राष्ट्रप्रमुख यून सुक- ये ओ, सौदीचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा, बांग्लादेशच्या पंतप्रधान हसिना शेख, तुर्कीयेचे अध्यक्ष तैयप एर्दोगन, अर्जेंटिनाचे अध्यक्ष अल्बर्टो फर्नांडिस हे नेते या परिषदेला उपस्थित राहतील.