G20 Summit : सर्व देशाचे प्रमुख काळ्या रंगाची गाडीच का वापरतात? जाणून घ्या कारण
Black Vehicles : जी 20 बैठकीसाठी जगभरातील देशांचे प्रमुख भारतात दाखल झाले आहेत. पण हे सर्व प्रमुख काळ्या रंगांच्या गाड्या वापरत असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
मुंबई : जी20 संमेलनासाठी जगभरातील देशांचे राष्ट्राध्यक्ष भारतात दाखल झाले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रों यांच्यासह अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जापान, मॅक्सिको, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका, तुर्की या देशांचे प्रमुख उपस्थित आहेत. या सर्व देशांच्या नेत्यांचं विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आलं. पण तुम्हाला यावेळी एक गोष्ट लक्षात आली असेल. ती म्हणजे सर्व प्रमुख नेते हे काळ्या रंगाच्या गाडीतून रवाना झाले. त्यामुळे सर्व देशांचे प्रमुखे काळ्या रंगाची गाडी का वापरतात असा प्रश्न नक्कीच पडला असेल. इतकंत काय तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील काळ्या रंगाच्या गाडीचा वापर करतात.
काळ्या रंगाची कार का?
मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून विचार केला तर, काळा रंग हा शक्ति आणि गुण दर्शवतो. यामुळे सामर्थ्य आणि अधिकार दिसून योतो. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी एस्कॉर्ट कारचा रंग हा फक्त काळाच असतो. अमेरिकेतील गुप्तचर यंत्रणाही काळ्या रंगाची वाहनं वापरते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन भारतात आले तेव्हा द बीस्ट या हायटेक कारने विमानतळ ते दिल्ली असा प्रवास केला. या कारचा रंगही काळाच आहे.
द बीस्ट कारचं वैशिष्ट्य
अमेरिकेच्या राष्ट्रध्यक्षांसाठी असलेल्या कारचं नाव द बीस्ट आहे. जगातील सर्वात सुरक्षित कार गणली जाते. या गाडीत बसलेल्यांना साधा ओरखडाही येणार नाही असं सांगितलं जातं. बुलेट प्रूफ काचा, गॅस डिस्पेंसर अशी वैशिष्ट्ये आहेत. विशेष म्हणजे या कारची चाकं झिजत नाहीत. पुढचा दरवाजा 5 इंच जाडीचा असून मागचा दरवाजा 8 इंच जाडीचा आहे. कारमध्ये राष्ट्राध्यक्षांच्या रक्तगटाच्या दोन बाटल्या ठेवलेल्या असतात. तसेच ऑक्सिजन यंत्रणाही असते. यात पॅनिक बटण असून पेंटॅगॉनला कनेक्ट आहे. या गाडीचं वजन 2000 पौंड असून यात 7 जण बसू शकतात.
काही देशांचे राष्ट्राध्यक्ष वेगळ्या रंगांच्या गाड्या वापरताना दिसले आहेत. फिलीपींसचे राष्ट्रपती रेमन मॅग्सेसे यांनी 1953 मध्ये सिल्व्हर रंगाच्या कारमधून एका उद्घाटनाला गेले होते. 1962 मध्ये राष्ट्रपती फर्डिनेंड मार्कोस यांनीही अशीच कार वापरली होती.
जी 20 शिखर बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली
जी-20 शिखर बैठकीच्या पहिल्या दिवशी जी-20 चं घोषणापत्र जाहीर करण्यात आलं. 37 पानांच्या घोषणापत्रात भारताच्या वसुधैव कुटुंबकम नीती आणि सुरक्षित भविष्याबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. जगात शांततापूर्ण स्थिती असावी यावर जोर देण्यात आला. इतकंच काय तर दहशतवादापासून युक्रेन युद्धाबाबतही मत मांडण्यात आलं आहे. अणुशस्त्रांचा वापर अस्वीकार्य असल्याचं देखील सांगण्यात आलं.