Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BJP : संसदीय समितीमधून गडकरी बाहेर, भाजपाच्या संसदीय समितीचे महत्व काय?

पक्षाच्या संसदीय कामकाजाचे संचालन आणि समन्वय साधण्यासाठीच या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याबाबतीत मंडळ हे नियमावली बनवते. यामध्ये पक्षध्यक्षांशिवाय 10 सदस्य असतात. यातील एक सदस्य संसदेतील पक्षाचा नेता असतो, तर राष्ट्रीय अध्यक्ष संसदीय मंडळाचे प्रमुख असतो. अध्यक्ष हेच पक्षाच्या एका सरचटणीसाला संसदीय मंडळाचे सचिव म्हणून नियुक्त करतात.

BJP : संसदीय समितीमधून गडकरी बाहेर, भाजपाच्या संसदीय समितीचे महत्व काय?
भारतीय संसदीय मंडळ
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 9:16 PM

मुंबई :  (BJP Party) भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी अमित शाह असताना सन 2014 मध्ये (Parliamentary Committee) संसदीय समितीची स्थापना करण्यात आली होती. त्यानंतर थेट आता भाजपाच्या संसदीय समितीची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या समितीमधून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि शिवराज चौहान यांना बाहेर रहावे लागणार आहे तर यामध्ये (Devendra Fadnavis) महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. ही निवड कीती महत्वाची आहे आणि या समितीचे नेमके काम काय राहते हे देखील माहित असणे गरजेचे आहे. या समितीचे नेमके पक्ष बांधणीत काय महत्व आहे ते आपण जाणून घेणार आहोत. भाजपने नवीन संसदीय मंडळ आणि केंद्रीय निवडणूक समितीची घोषणा केली आहे.

संसदीय मंडळाचे काय आहे महत्व?

पक्षाच्या संसदीय कामकाजाचे संचालन आणि समन्वय साधण्यासाठीच या मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. यामध्ये कोणत्या बाबींचा समावेश असावा याबाबतीत मंडळ हे नियमावली बनवते. यामध्ये पक्षध्यक्षांशिवाय 10 सदस्य असतात. यातील एक सदस्य संसदेतील पक्षाचा नेता असतो, तर राष्ट्रीय अध्यक्ष संसदीय मंडळाचे प्रमुख असतो. अध्यक्ष हेच पक्षाच्या एका सरचटणीसाला संसदीय मंडळाचे सचिव म्हणून नियुक्त करतात. मंडळाचे काम हे मंत्रिमंडळ स्थापनेसाठी मार्गदर्शन करणे, विधिमंडळ व संसदीय पक्षाच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, शिस्तभंगाच्या विषयावर विचार करणे याचा समावेश असतो. तर केंद्र आणि राज्य सरकार स्थापनेतही मंडळाची महत्वाची भूमिका असते.

असे आहे भाजपाचे संसदीय मंडळ

भाजपचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी नव्या संसदीय मंडळाची घोषणा केली आहे. पक्षाध्यक्षांव्यतिरिक्त 10 सदस्यांचा संसदीय मंडळात समावेश करण्यात आला आहे. यामध्ये नरेंद्र मोदी, राजनाथ सिंह, अमित शाह, बी एस येडियुरप्पा, सर्बानंद सोनोवाल, के लक्ष्मण, इक्बाल सिंह लालपुरा, सुधा यादव, सत्यनारायण जटिया आणि बीएल संतोष यांचा समावेश आहे.

केंद्रीय निवडणुक समितीचे महत्व

भाजपा पक्षामध्ये केंद्रीय निवडणुक समितीलाही महत्व आहे. मंडळातील सदस्यांशिवाय यामध्ये 8 नवनिर्वाचित सदस्य असतात. तर महिला मोर्चाच्या अध्यक्षा ह्याच पदसिद्ध सदस्य असतात. समिती संसद आणि विधीमंडळाच्या निवडणुकांसाठी उमेदवार कोण याची निवड या समितीद्वारे होते. याच समितीच्या माध्यमातून निवडणूक प्रचारही राबवला जातो. राज्यातील निवडणुका आणि तिकीट वाटपामध्येही या समितीचा महत्वाचा रोल असतो. त्यामुळे पक्षाचे संघटन आणि पक्ष उभारणीत संसदीय मंडळ आणि संसदीय समिती महत्वाची आहे.

गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा
साडीवाली दीदी..शिंदेंनंतर भाजपच्या बड्या महिला नेत्यावर कामराचा निशाणा.
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा
पत्रकार परिषदेत उज्वल निकम यांचा मोठा दावा.
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'
संभाजीराजे 'वाघ्या'बाबत म्हणाले, 'महाराजांना अग्नि दिला त्यावेळी...'.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 10 एप्रिलला.