केएन राजन्नाच नव्हे इतर 3 मंत्र्यांनाही हनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न, गौप्यस्फोटाने खळबळ
"कर्नाटक राज्यातील राजकारणात हॅनीट्रॅप हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. राजकारण्यांना संपवण्याच्या हेतूने हॅनीट्रॅपचा प्रयत्न केला आहे, अशी चर्चा आहे. याआधी हॅनीट्रॅप प्रकरणात काही राजकीय नेत्यांनी आपली पत गमावल्याची काही उदाहरणे आपल्या समोर आहेत. याच दरम्यान, आता शक्ती सिध, विधानसौधच्या कार्यालयांमध्ये काही मंत्र्यांना हॅनिट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला आहे, ज्यामुळे खळबळ निर्माण झाली आहे.

कर्नाटकच्या राजकारणात हॅनीट्रॅप हा पुन्हा चर्चेचा विषय बनला आहे. काल विधानसभेच्या अधिवेशनातदेखील हाच मुद्दा गाजला होता. आमदार यत्नाळ यांनी सोडलेला हॅनिट्रॅप बॉम्ब मोठ्या चर्चेला कारणीभूत ठरला आहे. सहकार मंत्री हॅनिट्रॅपचे शिकार झाले आहेत, असे त्यांनी खुलेपणाने सांगितले. त्यानंतर सहकार मंत्री के. एन. राजन्न यांनी स्वतः उभं राहून, त्यांना हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, असे कबूल केले. त्याचबरोबर, 48 जणांची सीडी असल्याचा एक नवीन बॉम्बही त्यांनी फेकला. होय… राजन्न यांनी जे सांगितले ते सत्य आहे. सहकार मंत्री के. एन. राजन्न यांच्याबरोबरच राज्य मंत्रिमंडळाच्या आणखी तीन मंत्र्यांना हॅनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला, अशी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे.”
“हॅनिट्रॅप टीमला लॉक करणारे मंत्री
कर्नाटकची राजधानी बंगळूरूतील दोन मंत्री आणि मुंबई-कर्नाटका भागातील प्रभावशाली मंत्र्यांना हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला गेला होता. मात्र हॅनीट्रॅपचे संकेत मिळताच, बंगळूरूतील एक मंत्री सतर्क झाले आणि हॅनीट्रॅप करण्यासाठी आलेल्या टीमलाच त्यांनी अडकवून लॉक केलं. त्यांची ओळख उघड करत या कृत्यामागे कोणाता हात आहे, कोण या कृत्याचे कर्ते कोण आहेत हे समोर आणण्यात यशस्वी झाले.”
“ते लोक सापडताच घाबरले आणि हनीट्रॅपच्या मागे कोण हेही त्यांनी थेट सांगून टाकलं. या कृत्याचा सूत्रधार कोण आहे, याबद्दल मंत्र्यांनी त्यांच्या तोंडूनच प्रत्येक तपशील मिळवला. सर्व माहिती उघड झाल्यानंतर त्यांच्यावरच हा डाव उलटून टाकण्याचा विचार करत हनीट्रॅप टीमने त्यांची सर्व माहिती पूर्णपणे जाणून घेत त्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही केलं” असं समजतं.
इतर 3 मंत्र्यांनाही अडकवण्याचा झाला प्रयत्न
या संपूर्ण घटनेवर शांत राहलेल्या बंगळूरूतील त्या मंत्र्याने पुढचं पाऊल उचललं. आणि आपल्यासारखचे इतर कोण कोण या हॅनीट्रॅपच्या जाळ्यात अडकले आहेत, याबद्दलही त्या गँगकडून संपूर्ण माहिती मिळवली. त्यानंतर, केवळ राजन्न नाही तर इतर तीन मंत्र्यांनाही जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, अशी धक्कादायक माहिती हॅनीट्रॅप गँगने उघड केली. त्यांच्याकडून याप्रकरणातील सखोल माहिती मिळवल्यानंतर बंगळूरूतील मंत्री आणि इतर तीन मंत्र्यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे. तसेच,पक्षाच्या हायकमांडचे या प्रकरणाकडे लक्ष वेधावे, अशी मागणी केली आहे.”
“मंत्रिमंडळातील चार सदस्यांचा आग्रह आणि या संपूर्ण प्रकरणाचे गांभीर्य जाणून घेत, मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे विधानमंडळ अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीला जाऊन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना या हॅनीट्रॅप प्रकरणाबद्दल तपशील देण्यासाठी सज्ज झाले होते. पण त्याआधीच काल सभागृहात स्वतः के. एन. राजन्न यांनीच हा गौप्यस्फोट केला. त्यांना हॅनिट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाला होता, असे त्यांनी खुलेपणाने सांगितलं.”
या मंत्र्यांनी घेतली बैठक
हॅनीट्रॅपच्या प्रयत्नाबद्दल संपूर्ण माहिती मिळवलेल्या मंत्र्यांनी, आपल्या आणखी तीन सहकारी मंत्र्यांना एकत्र करून एका ठिकाणी बैठक घेतली. हे मंत्री दुसरे कोणी नव्हे तर सिद्धरामय्या यांच्या गटाचेच सदस्य होते. त्या सर्वांनी मिळून हॅनीट्रॅप प्रयत्न आणि या हॅनीट्रॅपच्या मागे असलेल्या लोकांच्या कुटीलपणाबद्दल सविस्तरपणे चर्चा केली. तसेच, त्या गँगने जे पाऊल उचलेले, त्यातील सर्व तपशील एकेक करून उघडले. हे सर्व ऐकून मंत्री चांगलेच चक्रित झाले. त्यानंतर हॅनीट्रॅप सूत्रधाराविरुद्ध ते जोरदार आक्रमक झाले. त्यांनी एकत्र जाऊन थेट मुख्यमंत्र्यांसमोर जात हा प्रकार उघड केला आणि याबद्दल तक्रारही केली.”
दिल्ली गाठत हायकमांडनाही दिली माहिती
मुख्यमंत्र्यांना ही संपूर्ण घटना लक्षात आणून दिल्यानंतरही ते मंत्री शांत बसले नाही. असे नीच कृत्य करणाऱ्यांना योग्य धडा शिकवण्याचा निर्धार करत त्या मंत्र्यांनी थेट दिल्ली गाठली आणि हायकमांडच्या नेत्यांना या हॅनीट्रॅप प्रकरणाची माहिती दिली. गेल्या एक महिन्यापासून कोणकोणते मंत्री दिल्लीला गेले आहेत, हे काही आता गुपित राहिलेलं नाही. आता अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या दिल्लीला जाऊन हायकमांडसोबत याबद्दल चर्चा करण्याची शक्यता आहे.”
सुनील कुमार यांनी केला गौप्यस्फोट
मुख्यमंत्र्यांच्या गटाच्या मंत्र्यांच्या बैठका, दिल्लीचा दौरा यासह, गेल्या काही दिवसांपासून राज्य काँग्रेसमध्ये घडत असलेल्या काही महत्त्वाच्या घडामोडींमुळे काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाली. त्यांतर काही वरिष्ठ नेत्यांपर्यंत आणि काही पत्रकारांपर्यंत या हनीट्रॅप प्रकरणाची माहिती पोहोचली. बघता बघता एकाच्या तोंडून दुसऱ्याच्या कानापर्यंत ही माहिती पसरली आणि अवघ्या काही काळातच विरोधी पक्षातील नेत्यांनाही या घटनेची कुणकुण लागली. ही बातमी समजल्यावर, (19 मार्च) सुनील कुमार यांनी सभागृहात मंत्र्यांना हॅनीट्रॅपच्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्याचे जाहीर केलं आणि ही बातमी सर्वत्र पसरली.
मंत्र्यांना लक्ष्य केले जात असल्याच्या चर्चेने काँग्रेसमध्ये वादळ उडवले आहे. इतक्या दिवसांपासून गुपचूप फिरत असलेल्या या बातमीनंतर, प्रथम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी हॅनीट्रॅप प्रयत्नाबद्दल आपली प्रतिक्रिया दिली आणि हेचं खरं असल्याची पुष्टी केली. त्यानंतर, सभेत हॅनीट्रॅपविषयी चर्चा चांगलीच तुफान झाली. त्याचबरोबर, आज पुन्हा यत्नाळ यांनी सभेत धमाका करत हॅनीट्रॅपच्या जाळ्यात अडकलेल्या लोकांच्या तोंडून त्याची माहिती उघड केली.
सध्या हॅनीपबद्दलची चर्चा विधानसभेच्या अधिवेशनानंतर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. केवळ एका मंत्र्यालाच नव्हे तर तीन मंत्र्यांना हॅनीट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती उघड झाली असून महत्त्वाच्या मंत्र्यांसह त्यांचे विश्वासू मंत्री हायकमांडला तक्रार देण्यासाठी सज्ज असल्याचे समजले आहे.
एकूणच, राज्याच्या राजकारणात धमाका केलेला या हॅनीट्रॅपने काँग्रेसमध्ये चांगला गदारोळ निर्माण केला असून आणि आता हे प्रकरण कुठपर्यंत जाऊन थांबते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. काँग्रेसमध्ये आधीच गटबाजी सुरू आहे, आणि पुढील काही दिवसांत हे प्रकरण कोणत्या वळणावर येईल ते स्पष्ट होईल.