Marathi News National Gas cylinder price a subsidy of rs 200 per gas cylinder for upto 12 cylinders a year will be granted to over 9 crore beneficiaries of the pm ujwala yojana
Gas Cylinder Price : घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडी, वर्षाला 12 सिलेंवर योजना लागू, 9 कोटी जनतेला फायदा
घरगुती गॅस सिलेंडरसाठी 200 रुपये सबसिडी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ही योजना वर्षाला 12 सिलेंडरसाठी लागू असेल. याचा फायदा देशातील 9 कोटी जनतेला होणार आहे.
घरगुती गॅस वापरकर्त्यांना प्रति सिलिंडर 200 सबसिडीImage Credit source: tv9
नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून महागाईने (Inflation) हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) , गॅस सिलेंडरबाबत (Gas Cylinder Price) आज मोठे निर्णय झाले आहेत. घरगुती गॅस सिलेंडरसाठी 200 रुपये सबसिडी केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. ही योजना वर्षाला 12 सिलेंडरसाठी लागू असेल. याचा फायदा देशातील 9 कोटी जनतेला होणार आहे. तसेच पेट्रोलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 8 रुपये आणि डिझेलवरील केंद्रीय उत्पादन शुल्क प्रति लिटर 6 रुपयाने कमी होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून देशात महागाईवरून जनता तक्रारी करत आहे. तसेत विरोधकांकडूनही केंद्र सरकारवर जोरदार टीकाही होत आहे. महागाईविरोधात अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. महिलांना घरगुती गॅस परवडत नसल्याने त्यांनी रस्त्यावर चुली मांडून आंदोलनं केली. हे सर्व लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून हा निर्णय घेण्यात आलाय.
एएनआय वृत्तसंस्थेचे ट्विट
We are reducing the Central excise duty on Petrol by Rs 8 per litre and on Diesel by Rs 6 per litre. This will reduce the price of petrol by Rs 9.5 per litre and of Diesel by Rs 7 per litre: Union Finance Minister Nirmala Sitharaman
देशात वाढलेल्या महागाईने गृहीणीही बेजार झाल्या होत्या. पुन्हा चुलीकडे वळण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मात्र आता पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर प्रमाणे वर्षाला 12 सिलिंडरला सबसिडी मिळणार आहे अशी घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी केली आहे. आम्ही पंतप्रधान उज्ज्वला योजनेच्या 9 कोटीपेक्षा अधिक लाभार्थ्यांना 200 रुपये प्रति गॅस सिलिंडर (12 सिलिंडर) सबसिडी दिली जाणार. यामुळे आमच्या माता-भगिनींना मदत मिळेल, असं असे त्यांनी जाहीर केली आहे.
पेट्रोल डिझेलबाबातही मोठा दिलासा
सध्या पेट्रोलने 120 रुपये तर डिझेलनेही कधीच शंभरी पार केल्याने अनेकांचे धाबे दणाणले होते. मात्र हेच दर 7 ते आठ रुपयांनी कमी होणार असल्याने वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसात पेट्रोलच्या वाढलेल्या किंमतीमुळे अनेकांनी वाहन बाहेर काढण्याचे बंद केले होते.