म्हैसूरः राहुल गांधींनी (Rahul Gandhi) जी भारत जोडो यात्रा पुकारली आहे, ती यात्रा आता लोकसमुहाची यात्रा बनली असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ सध्या कर्नाटकात आहे. शुक्रवारी दिवंगत पत्रकार गौरी लंकेश यांची आई आणि त्यांची बहीणही या यात्रेत सहभागी झाल्या होत्या. दोघांनी राहुल गांधींसोबत पदयात्राही केली आहे. गौरी लंकेश (Gauri Lankesh) यांच्या आई इंदिरा लंकेश (Indira Lankesh) आणि बहीण कविता लंकेश यांनी कर्नाटकातील मंड्या जिल्ह्यात राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यानंतर त्यांनी भारत जोडो यात्रेत सहभाग नोंदवला.
Gauri stood for Truth
Gauri stood for Courage
Gauri stood for FreedomI stand for Gauri Lankesh and countless others like her, who represent the true spirit of India.
Bharat Jodo Yatra is their voice.
It can never be silenced. pic.twitter.com/TIpMIu36nY— Rahul Gandhi (@RahulGandhi) October 7, 2022
राहुल गांधी यांनी इंदिरा लंकेश यांना मिठी मारून यात्रेत स्वागत केले तेव्हा जोरदार घोषणांनी परिसर दुमदूमून गेला होता.
या पदयात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी गौरी लंकेश यांच्या आईचा हात धरून पदयात्रेत चालत राहिले होते. त्यांचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाल आहे.
गौरी लंकेश यांचे कुटुंबीय ‘भारत जोडो यात्रे’त सामील झाले तेव्हा राहुल गांधी भावूक होत त्यांनी त्यांचे स्वागत केले मात्र काही वेळातच त्यांनी ट्विट करत म्हटले की, ‘गौरी सत्याच्या बाजूने उभी राहिली आहे.
गौरी हिम्मतवान होती म्हणून ती निर्भयपणे उभी होती. गौरी स्वातंत्र्यासाठी उभी राहिली. मी गौरी लंकेश आणि त्यांच्यासारख्या असंख्य जणांसाठी मी उभा असल्याचेही त्यांनी सांगितले.
जे खऱ्या भारताच्या बलिदानाचे, आत्म्याचे प्रतिनिधित्व करतात. त्यांचा आवाज म्हणजे ही भारत जोडी यात्रा असल्याचेही त्यांनी सांगितले.
अब हम न डरेंगे, न झुकेंगे, न रुकेंगे.’ असं म्हणत काँग्रेसने आपल्या ट्विटर हँडलवर पत्रकार आणि कार्यकर्त्या गौरी लंकेश यांचे कुटुंबीय भारत जोडो यात्रेत राहुल गांधींसोबत आले असल्याचे सांगितले होते.
गौरी लंकेश यांचा धाडसी आणि निर्भीड आवाज द्वेषाने आणि हिंसाचाराने दाबला गेला होता असंही त्यांनी म्हटले आहे.
देशात पसरलेल्या या द्वेषाच्या विरोधात ही यात्रा सुरु असल्याचे सांगत आता आम्ही घाबरणार नाही, झुकणार नाही, थांबणार नाही अशी हाकही त्यांनी दिली आहे.
गौरी लंकेश यांची 5 सप्टेंबर 2017 रोजी बेंगळुरूमधील राजराजेश्वरी नगर, येथे त्यांच्या घराजवळ गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.
उद्योगपतींची कर्जमाफी आणि शेतकरी आत्महत्यांचा सवाल उपस्थित करत काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी शुक्रवारी भाजपला धारेवर धरले.
भाजपची सत्ता असलेल्या या देशात दोन भारत आहेत. त्यातील एक देश येथील कोणालाच मान्य नसल्याचे ट्विट त्यांनी केले आहे.
यावेळी त्यांनी कालचा प्रसंग शेअर करत म्हटले की, काल मी एका महिलेला भेटलो होतो, तिच्या शेतकरी पतीने 50,000 रुपयांच्या कर्जासाठी आत्महत्या केली आहे.
तर त्याच्या उलट एक भारत आहे, जो भाजपच्या भांडवलदार मित्रांना 6 टक्के व्याजाने कर्ज आणि कोटींची कर्जमाफी देतो.