ईशा महाशिवरात्री सोहळ्यासाठी आता सज्ज व्हा, पूर्ण वेळापत्रक पहा…

| Updated on: Feb 18, 2023 | 9:01 PM

ईशा सद्गुरुच्या वेबसाइटवर थेट ध्यान कार्यक्रमात सहभाग नोंदवता येणार होता. यासोबतच देशातील प्रमुख टीव्ही चॅनेल्सवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

ईशा महाशिवरात्री सोहळ्यासाठी आता सज्ज व्हा, पूर्ण वेळापत्रक पहा...
Follow us on

नवी दिल्लीः ईशा महाशिवरात्री 2023 चे आयोजन आज म्हणजेच 18 फेब्रुवारी रोजी करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित होत्या. राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांचा तामिळनाडू हा पहिलाच दौरा होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक प्रशासनही कार्यक्रमामध्ये सक्रिय होते. या कार्यक्रमामध्ये संगीत, नृत्य आणि ध्यानाच्या माध्यमातून भगवान शंकराची पूजा केली गेली.

हा कार्यक्रम आज संध्याकाळी 6.30 वाजता सुरू झाला होता. याचे लाईव्ह स्ट्रिमिंग 16 भाषांमध्ये केले गेले होते. तर सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली ध्यान, संगीत आणि नृत्याचे आयोजन करण्यात येणार आले होते. यादरम्यान भाविक ध्यान धारनेत मग्न झाले होते. यासोबतच सद्गुरूंची विशेष पूजाही केली गेली होती.

 

या कार्यक्रमामध्ये निलाद्री कुमार, टॉलिवूड गायक राम मिरियाला आणि तमिळ गायक वेलमुरुगन, लोकगायक मामे खान यांच्यासह अनेक प्रसिद्ध कलाकारांनी आपली हजेरी लावली.

याशिवाय कोलकाताच्या अनन्या चक्रवर्ती, गीतकार राम मिरियाला, भारतीय गायिका मंगली आणि इतर अनेक कलाकारही सहभागी झाले होते. तर सद्गुरु रुद्राक्षाची विशेष पूजा करण्याचेही आयोजन केले गेले होते.

आज सायंकाळी 6 वाजल्यापासून या कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. हा कार्यक्रम रात्रभर चालार आहे. तर या कार्यक्रमात सामील होण्यासाठी आत्मसाक्षात्काराचे शक्तिशाली केंद्र असलेल्या ईशा योग केंद्रातही जाण्याची सोय केली गेली होती.

याशिवाय ईशा सद्गुरुच्या वेबसाइटवर थेट ध्यान कार्यक्रमात सहभाग नोंदवता येणार होता. यासोबतच देशातील प्रमुख टीव्ही चॅनेल्सवरही या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.

6.15 PM पंचभूत आराधना 6.40 PM लिंग भैरवी महा आरती 7.15 PM आदियोगी दिव्य दर्शनम 7.40 PM संगीत नृत्य आणि सांस्कृतिक कार्यक्रम 10.00 PM सद्गुरु सोबत मध्यरात्री ध्यान 1.00 PM शंभो 1.00 PM शंभोग्राम मेडीटेशन 3.5 शंभोग्राम 5 म्युझिक 3.5 शंभो 5 म्युझिक 3.5 शंभो 3.00 वाजता संगीत कार्यक्रम मुहूर्त मंत्रांच्या जपासह. तसेच या कार्यक्रमाचे सहा विभागामध्ये आयोजन केले गेले आहे. त्याचा लाभ नागरिकांना घेता येणार आहे.