सटाक्…. दिल्ली मेट्रोत आता भांडणही; तरूणीने तरूणाला लगावली थप्पड; Video व्हायरल

दिल्ली मेट्रो ही तिच्या प्रवासाबद्दल, सुविधांबद्दल कमी आणि त्यातील प्रवाशांमुळेच जास्त चर्चत असते. आता मेट्रोतील एक नवा व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये एक मुलगी तरूणाला सटासट थप्पड मारताना दिसत आहे.

सटाक्.... दिल्ली मेट्रोत आता भांडणही;  तरूणीने तरूणाला लगावली थप्पड; Video व्हायरल
मेट्रोत आता भांडणही !
Image Credit source: Twitter
| Updated on: Jul 04, 2023 | 3:47 PM

नवी दिल्ली : कधी कोणी डान्स करतं, कुणी किस, तर कधी कोणी अश्लील चाळे… राजधानी दिल्लीतील प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू झालेली मेट्रो (delhi metro) ही तिच्या सुविधांमुळे नव्हे तर प्रवाशांच्या कृत्यामुळेच चर्चेत असते. मेट्रोतील अतरंगी व्हिडीओही व्हायरल (viral vidoes) होत असतात. आता असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. मात्र तो पाहून सर्वच अवाक् झाले आहेत. या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर दोन गट पडले असून घमासान चर्चा सुरू आहे. असं काय आहे त्या व्हिडीओमध्ये ? चला जाणून घेऊया.

दिल्ली मेट्रोतील हा नवा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यामध्ये प्रवास करणाऱ्या जोडप्याचे भांडण सुरू असल्याचे दिसत आहे. त्यादरम्यान ती मुलगी समोरील मुलाला सटासट कानाखाली लगावते आणि त्याच्यावर जोरात ओरडताना दिसत आहे. हे सर्व सुरू असताना आजूबाजूचे लोक मात्र फक्त बघ्याच्या भूमिकेत असून कोणीही त्यांचं भांडण सोडवण्याचा किंवा त्या मुलीला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.

यावरूनच सोशल मीडियावर गट पडले असून, हेच जर त्या मुलाने त्या मुलाल मारलं असतं, तर काय झालं असतं ? लोकं असे शांत बसले असते का ? असा प्रश्न युजर्स विचारत आहेत. ‘घर के कलेश’ नावाच्या ट्विटर हँडलवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून तो तूफान व्हायरल झाला आहे.

 

या ट्विटमधील व्हिडीओ पाहून लोकं विविध प्रकारच्या कमेंट्सही करत आहेत. एका यूजरने लिहिलं आहे की, खरं तर बहुतांश मुली निराश आहेत! ज्यांच्याकडे काहीच नाहीये आणि ज्यांच्याकडे सर्व काही आहे… तरीही त्यांची मन:स्थितीत सेम असते. तुम्ही तुमचा आनंद इतरांकडे शोधू शकत नाही. स्वत:च्या आनंदासाठी मन गुंतवा, काम करा, इतरांवर अवलंबून राहू नका, अशा आशयाची कमेंट त्या युजरने केली आहे.

तर दुसरा युजर हा व्हिडीओ पाहून खूपच भडकला आहे. आत्ता त्या मुलीच्या जागी मुलगा असता, आणि त्याने अशी कोणाला थप्पड लगावली असती, तर मेट्रोतील हे पब्लिक एवढं शांत बसलं असतं का ? असा खडा सवाल त्याने विचारला आहे.