दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन; त्यांच्या खास आवाजामुळे वेगळी ओळख

गीतांजली अय्यर या त्या काळातील काही महिला अँकरपैकी एक होत्या. त्यांच् निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांची एक पोकळी निर्माण झाली आहे.

दूरदर्शनच्या लोकप्रिय न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन; त्यांच्या खास आवाजामुळे वेगळी ओळख
Follow us
| Updated on: Jun 08, 2023 | 7:07 AM

नवी दिल्ली : दूरदर्शनच्या पहिल्या इंग्रजी न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे बुधवारी निधन झाले. गीतांजली अय्यर यांनी 30 वर्षांहून अधिक काळ दूरदर्शनवर अँकरिंग केले. 1971 मध्ये त्या दूरदर्शनबरोबर जोडल्या गेल्या होत्या. त्यांच्या अनेक दशकांच्या कारकिर्दीत त्यांना चार वेळा सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला होता. गीतांजली अय्यर यांनी इंग्रजीमध्ये पदवीपूर्व शिक्षण घेतले होते. त्यानंतर त्यांनी कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले होत. तर गीतांजली अय्यर यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचा डिप्लोमाही त्यांनी केला होता.

एकेकाळी गीतांजली अय्यर, मीनू तलवार, नीती रवींद्रन आणि सलमा सुलतान या टीव्ही न्यूज इंडस्ट्रीतील स्टार्स म्हणून ओळखल्या जात होत्या. केबल येण्याआधीच्या काळातील या न्यूजअँकर्स होत्या. त्या काळात दूरदर्शन हे जगाच्या बातम्या जाणून घेण्याचे एकमेव माध्यम होते.

दूरदर्शनमध्ये न्यूज अँकर म्हणून यशस्वी कारकीर्दीनंतर गीतांजली अय्यर यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन आणि मार्केटिंगच्या जगतातही प्रवेश केला होता.

त्या उद्योग संघटना सीआयआयच्या सल्लागार पदीही काही काळ होत्या. तर त्याच वेळी त्यांनी ‘खानदान’ या मालिकेतही भूमिका केली होती. त्या काळात त्यांचा एक प्रसिद्ध चेहरा म्हणून ओळख निर्माण झाली होती.

न्यूज अँकरिंग व्यतिरिक्त त्या जाहिरात क्षेत्रात सक्रियपणे काम करत होत्या. गीतांजली अय्यर यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठीही काम केले.

गीतांजली अय्यर या त्या काळातील काही महिला अँकरपैकी एक होत्या. त्यांच् निधनामुळे पत्रकारिता क्षेत्रात त्यांची एक पोकळी निर्माण झाली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.