कवडीमोलाचा गुन्हेगार…24 तास द्या, संपूर्ण नेटवर्क संपवतो; थेट खासदाराची लॉरेन्स बिश्नोईला धमकी

बाबा सिद्दीकी यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी या हत्याकांडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. कुविख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई हा या हत्याकांडाचा मास्टरमाइंड असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, या हत्याकांडानंतर बिहारमधील खासदार पप्पू यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पप्पू यादव यांनी थेट बिश्नोईलाच धमकी दिली आहे.

कवडीमोलाचा गुन्हेगार...24 तास द्या, संपूर्ण नेटवर्क संपवतो; थेट खासदाराची लॉरेन्स बिश्नोईला धमकी
lawrence bishnoi
Follow us
| Updated on: Oct 14, 2024 | 8:35 PM

मुंबईत एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. त्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. केवळ सलमान खानच्या जवळचे असल्याने बाबा सिद्दीकी यांना बिश्नोई गँगने उडवलं आहे. त्यामुळे बिश्नोई गँगची दहशत निर्माण झाली आहे. तुरुंगात असलेला लॉरेन्स बिश्नोई काहीही करू शकत असल्याचं उघड झालं आहे. असं असतानाच दुसरीकडे बिहारच्या पूर्णियाचे खासदार पप्पू यादव यांनी थेट लॉरेन्स बिश्नोईलाच धमकी दिली आहे. तुरुंगात असलेला कवडीमोलाचा गुन्हेगार कधी मूसेवालाला मारत आहे, तर कधी करणी सेना प्रमुखाची हत्या करत आहे. आता त्याने बाबा सिद्दीकींना मारलं आहे. जर मला कायद्याने परवानगी दिली तर मी 24 तासात बिश्नोईचं नेटवर्क उद्ध्वस्त करून टाकेन, असा इशाराच पप्पू यादव यांनी दिला आहे.

पप्पू यादव यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करून हा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी पोलीस व्यवस्थेवरही तोंडसुख घेतलं आहे. हा देश आहे की… एक गुन्हेगार तुरुंगात बसून आव्हान देत लोकांना मारत आहे. आपण मात्र मूकदर्शक बनून सर्व काही पाहत आहोत. कायद्याने माझे हात बांधले आहेत. नाही तर या गुंडाची संपूर्ण टोळीच मी अवघ्या 24 तासात उद्ध्वस्त करू शकतो. एक बदमाश तुरुंगात राहून एकामागोमाग एक गुन्हे घडवत आहे. अन् देशभरातील पोलीस हातावर हात ठेवून बसली आहे, ही अजबच परिस्थिती आहे, असा संताप पप्पू यादव यांनी व्यक्त केला आहे.

खासदार पप्पू यादव यांनी लॉरेन्स बिष्णोई याला धमकी दिली आहे –

MP Pappu Yadav threatens Lawrence Bishnoi

MP Pappu Yadav threatens Lawrence Bishnoi

चौथ्याला अटक

दुसरीकडे पोलिसांनी बाबा सिद्दीकी हत्याकांडात सहभागी असलेल्या चौथ्या आरोपीलाही पोलिसांनी अटक केली आहे. मोहम्मद झिशान अख्तर असं या आरोपीचं नाव आहे. तो नकोदर येएथील शकर गावातील रहिवासी आहे. दोन वर्षापूर्वी हत्येच्या एका प्रकरणात जालंधर पोलिसांनी त्याला अटक करून तुरुंगात टाकलं होतं. मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी आतापर्यंत तीन लोकांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेली दोन्ही आरोपी शुटर आहेत. गुरमेल सिंग हा हरियाणाच्या कॅथल इथला आहे. तर यूपीच्या बहराइच येथील धर्मराज यालाही अटक केली आहे. तिसरा शुटर शिवकुमार हा फरार होता.

निरोप मिळताच मुंबईकडे रवाना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 7 जून रोजी झिशान तुरुंगात सुटला होता. त्यानंतर तो शूटर गुरमेल याला जाऊन भेटला होता. हरियाणाच्या कॅथल येथे त्याने गुरमेलची भेट घेतली होती. तिथेच त्यांना लॉरेन्स बिश्नोईचा संदेश मिळाला. त्यानंतर दोघेही बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यावर या कांडात अन्य लोक सहभागी झाले. या आरोपींनी आधी रेकी केली. बाबा सिद्दीकी यांच्या रुटीनची माहिती घेतली. त्यानंतर लॉरेन्स बिश्नोईला अपडेट दिली. बिश्नोईकडून होकार मिळताच या तिघांनी शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केल्याचं सूत्रांनी सांगितलं.

'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?
'कारण टायगर अभी जिंदा है...',अमोल कोल्हेंची फटकेबाजी, बघा काय म्हणाले?.
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?
उद्धव ठाकरेंवर अ‍ॅन्जिओप्लास्टी शस्त्रक्रिया, डॉक्टरांचा सल्ला काय?.
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन
भाजप आमदारासमोर महिलांना वाटलेल्या साड्या मराठा आंदोलकांनी पेटवल्या अन.
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ
UP च्या बहरइचमध्ये देवी विसर्जनावेळी गोळीबार, संतप्त जमावाकडून जाळपोळ.
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ
सिद्दीकींच्या हत्येचा कट याच घरात शिजला; बघा एक्सक्ल्युझिव्ह व्हिडीओ.
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली
बाबा सिद्दीकींसह झिशान यांच्याही हत्येचा होता कट, आरोपींची मोठी कबुली.
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका
राज ठाकरे राजकीय सस्तन प्राणी, जे साडेचार वर्षे..अंधारेंची बोचरी टीका.
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी
आचारसंहितेपूर्वी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाचा धडाका, 19 निर्णय जारी.
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'
सरकारकडून टोलमाफी अन् राज ठाकरे म्हणाले, 'ही आनंदाची बाब, पण फक्त...'.
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले...
सरकारकडून टोलमाफी अन् मनसेचा एकच जल्लोष; अविनाश जाधव म्हणाले....