petrol and diesel : खुशखबर; वाढत्या महागाईत लवकरच पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार?
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केवळ एक रुपयाची कपात झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता जागतिक पातळीवर अशा बातम्या आल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे.
नवी दिल्ली : सर्वसामान्यांना सरकारकडून वेगळी अशी कोणती वेगळी अपेक्षा नसते. सर्वसामान्य हे फक्त महागाई (Inflation) कमी होऊदे इतकचं ते मागत असतात. त्यात ही जर पेट्रोल आणि डिझेलच्या (petrol and diesel) दरात कपात झाली तर ही बाब त्यांच्यासाठी दिवाळी साजरी करावी अशी असते. असात मौका केंद्र सरकारनंतर राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिला आहे. आणि वाढत्या महागाईत दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. केंद्र सरकराने पेट्रोलच्या दरात 8 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 6 रुपयांनी कपात केल्यानंतर आता राज्य सरकारनेही सर्वसामान्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारने पेट्रोलच्या दरात 2 रुपये 8 पैसे आणि डिझेलच्या दरात 1 रुपये 44 पैशांची कपात केली आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्यांना वाढत्या महागाईत पेट्रोल आणि डिझेलच्या दरामुळे (price of petrol and diesel) थोडासा दिसाला मिळाला आहे.
पेट्रोल आणि डिझेलच्या दरात केवळ एक रुपयाची कपात झाली असली तरी सर्वसामान्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता जागतिक पातळीवर अशा बातम्या आल्याने पेट्रोल-डिझेल स्वस्त होण्याची अपेक्षा वाढली आहे. ऑर्गनायझेशन ऑफ ऑइल एक्सपोर्टिंग कंट्रीज (OPEC) आणि रशियासह इतर सहयोगी देशांनी जुलै-ऑगस्टपासून कच्च्या तेलाचे उत्पादन आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात वाढलेले कच्चा तेलाचे दर कमी होण्यास मदत मिळणार आहे.
कच्च्या तेलाचे उत्पादन वाढणार
ओपेक, रशिया आणि इतर सहयोगी देशांनी कच्च्या तेलाचे उत्पादन 6.48 लाख बॅरल प्रतिदिन वाढवण्याचे मान्य केले आहे. या निर्णयामुळे जगभरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होण्याची आशा वाढली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे कच्च्या तेलाचा वापर लक्षणीयरीत्या कमी झाला होता. तर कच्च्या तेलाच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती. त्यानंतर तेल उत्पादक देशांनी दर स्थिर ठेवण्यासाठी कच्च्या तेलाचे दैनंदिन उत्पादन कमी केले होते. कोरोनापूर्वी कच्च्या तेलाच्या उत्पादनाची पातळी गाठण्यासाठी हे देश हळूहळू उत्पादन वाढवत आहेत. सध्या दररोज 4.32 लाख बॅरल कच्च्या तेलाचे उत्पादन होत आहे.
रशिया-युक्रेन युद्धामुळे किमती वाढल्या
फेब्रुवारीच्या शेवटी रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. त्यामुळे रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादल्यामुळे कच्च्या तेलाचा पुरवठा विस्कळीत झाला होता. परिणामी, जगाला तीव्र महागाईचा सामना करावा लागत आहे. कारण जगातील बहुतेक देशांमध्ये महागाई वाढवण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या उच्च कारणीभूत आहेत.
कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याची ओपेक देशांची कोणतीही योजना आखली नसली तरी, आता उत्पादन वाढवण्याचा हा निर्णय घेण्यात आला आहे. तर हा निर्णय अशा वेळी घेण्यात आला आहे, जेव्हा कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतीमुळे अमेरिकेत पेट्रोलचे दर विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहेत. 2022 च्या सुरुवातीपासून अमेरिकेत कच्च्या तेलाच्या किंमती 54 टक्क्यांनी वाढल्या आहेत. दरम्यान ही चांगली आणि आनंदाची बातमी आल्यानंतर, न्यूयॉर्कमध्ये कच्च्या तेलाची किंमत 0.9% ने कमी झाल्या आहेत. तर प्रति बॅरल दर हा $ 114.26 वर स्थिरावला आहे. कच्च्या तेलाच्या उत्पादनातील या वाढीमुळे इंधनाच्या उच्च किमती कमी होण्यास आणि महामारीतून सावरलेल्या जागतिक अर्थव्यवस्थेत महागाई कमी होण्यास मदत होईल.
पेट्रोल एका झटक्यात 9.50 रुपयांनी स्वस्त
केंद्र सरकारने अलीकडेच पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे एका झटक्यात देशात पेट्रोलचे दर 9.50 रुपयांनी तर डिझेलचे दर 7 रुपयांनी कमी झाले. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 2 जून रोजी एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये आणि डिझेलचा दर 89.62 रुपये प्रति लिटर होता.