गोव्यात जाताय, फोटो काढताय, तर सावधान; आधी ही बातमी वाचा…

नव्या नियमानुसार पर्यटकांना यापुढे खुल्या ठिकाणी अन्न शिजवता येणार नाही तसे 50,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

गोव्यात जाताय, फोटो काढताय, तर सावधान; आधी ही बातमी वाचा...
Follow us
| Updated on: Jan 29, 2023 | 12:15 AM

पणजीः गोव्यातील पर्यटकांची सुरक्षितता लक्षात घेऊन सरकारने एक नवीन नियम जाहीर करण्यात आला आहे. या नियमांचे उल्लंघन केल्यास हजारो रुपयांचा दंड होऊ शकणार आहे. त्यामध्ये म्हटले आहे की पर्यटकांसोबत छायाचित्रे काढण्यापूर्वी किंवा त्यांचे वैयक्तिक फोटो काढण्यापूर्वी त्यांची परवानगी घेणे आवश्यक आहे, विशेषत: जेव्हा ते उन्हात सागरी किनारी झोपत असतील किंवा समुद्रात मजा करत असतील तेव्हा त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील गोपनीयतेचा आदर केला जाणार आहे.त्यामुळे पर्यटकांचे फोटो काढताना आता गोव्यात जाणाऱ्या पर्यटकांना काळजी घ्यावी लागणार आहे.

नव्या नियमानुसार पर्यटकांना यापुढे खुल्या ठिकाणी अन्न शिजवता येणार नाही तसे 50,000 रुपयांपर्यंत दंडही होऊ शकतो. त्याचबरोबर समुद्रकिनाऱ्यावर दारू पिणाऱ्यांवरही कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

शासनाने खडकांवर आणि धोकादायक ठिकाणी सेल्फी न घेण्याचाही सल्ला दिला आहे. त्यामुळे अपघातांना आळा बसणार आहे.

याशिवाय गोव्यातील ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान पर्यटकांनी करू नये, असे आवाहनही गोवा सरकारकडून पर्यटकांना करण्यात आले आहे.

एवढेच नाही तर जादा दर आकारू नयेत म्हणून टॅक्सीला मीटर पाहून भाडे देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक तत्त्वानुसार गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना पर्यटन विभागाकडे नोंदणीकृत हॉटेलमध्ये राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्यात येत असतात, ज्यांना गुंड कमी पैशात चोरीच्या बाईक किंवा कार विकत असतात. नव्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पर्यटकांना अशा लोकांपासून सावध राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

गोवा पर्यटन विभागाने 26 जानेवारी रोजी ही मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आली असून पर्यटकांची गोपनीयता, त्यांची सुरक्षा आणि फसवणुकीपासून त्यांचे संरक्षण करणे हा त्याचा उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.