सोने खरेदी करणाऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, सोन्याचा भाव घसरला
चीनमधील जीवघेण्या कोरोना विषाणूचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झालेला पाहायला मिळत आहे. मागणी कमी झाल्याने शुक्रवारी सोन्याचे भाव घसरले.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव गगनाला (Gold Rate Fall) भिडले होते. मात्र, आता जर तुम्ही सोने खदेरीचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी एक ‘गुड न्यूज’ आहे. सोन्याचे दर घसरले आहेत. चीनमधील जीवघेण्या कोरोना विषाणूचा परिणाम सोन्याच्या किंमतींवर झालेला पाहायला मिळत आहे. मागणी कमी झाल्याने शुक्रवारी सोन्याचे भाव घसरले. त्यामुळे दिल्लीच्या सराफा बाजारात 10 ग्राम सोन्याच्या किंमतीत 222 रुपयांची घसरण झाली आहे.
चांदीचेही भाव उतरले
सोन्यासोबतच चांदीच्या किमतीही घसरल्या आहेत (Gold Rate Fall). एक किलो चांदी 60 रुपयांनी स्वस्त झाली आहे.
शुक्रवारी सोन्याचा भाव
दिल्लीच्या सराफा बाजारात शुक्रवारी 99.9 टक्के शुद्ध सोन्याची किंमत आता 43,580 रुपयांवरुन 43,358 रुपये प्रती दहा ग्रामवर आलं.
आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर
त्याशिवाय, बुधवारी सोन्याचा भाव हा 43,502 रुपये प्रती दहा ग्राम होता. तर, मंगळवारी सोन्याचा भाव 43,564 रुपये प्रती दहा ग्राम होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 1,632 डॉलर प्रती औन्स आणि चांदी 17.25 डॉलर प्रती औन्स होता.
गुरुवारी सोन्या-चांदींच्या किंमतीत वाढ
गुरुवारी सोनं आणि चांदीच्या किंमती पुन्हा वाढल्या होत्या. गुरुवारी चांदीची किंमत 35 रुपयांनी वाढून 48,130 रुपयांवर पोहोचली.
सोन्याच्या किंमती आणखी कमी होण्याची शक्यता
HDFC सिक्युरिटीजचे समीक्षक तपन पटेल यांच्यानुसार, आंतरराष्ट्रीय स्तरावर किंमती कमी झाल्याने देशातील सोन्याच्या किंमतींवर त्यांचा परिणाम झाला आहे. येणाऱ्या काळात सोन्याच्या (Gold Rate Fall) किंमती आणखी घसरु शकतात.