GOLD RATE| सोन्याच्या दरात तेजी का? जाणून घ्या आजची किंमत

मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)नुसार आज सोन्याच्या किमतीत 253 रुपयांची वाढ होऊन प्रति तोळा 49 हजार 850 रुपयांवर सोन्याचा दर पोहोचला आहे.

GOLD RATE| सोन्याच्या दरात तेजी का? जाणून घ्या आजची किंमत
Follow us
| Updated on: Dec 17, 2020 | 12:14 PM

नवी दिल्ली: सोन्याच्या किमतीत आजही मोठी तेजी पाहायला मिळत आहे. डॉलरच्या किमतीत होत असलेली घट आणि रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कोणताही बदल करण्यात आला नसल्याने भारतीय बाजारात पुन्हा एकदा सोन्याची किंमत वाढलेली पाहायला मिळत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX)नुसार आज सोन्याच्या किमतीत 253 रुपयांची वाढ होऊन प्रति तोळा 49 हजार 850 रुपयांवर सोन्याचा दर पोहोचला आहे. तर चांदीच्या दरातही 929 रुपयांनी वाढ होऊन 66 हजार 840 रुपये प्रतिकिलो पर्यंत चांदीची किंमत पोहोचली आहे. (The reason behind the gold price hike)

बुधवारी राजधानी दिल्लीमध्ये सोन्याच्या किमतीत प्रति तोळा 215 रुपयांनी वाढ झाली होती. तर चांदीची किंमत 1 हजार 185 रुपये प्रति किलो प्रमाणे वाढली होती.

सोने-चांदीच्या दरात वाढ कशामुळे?

डॉलरच्या किमतीत होत असलेली घसरण आणि अमेरिकन काँग्रेसकडून दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेज पारित केल्याचा बातमीनंतर सोने आणि चांदीच्या किमतीत तेजी पाहायला मिळत आहे.

सोन्याच्या किमतीत वाढ होत असली तरी सोने आणि चांदीच्या दागिन्यांची विक्री ऑक्टोबरच्या तुलनेत 16 टक्क्यांनी वाढलेली पाहायला मिळत आहे. मात्र, 2019 चा विचार केला तर सण-उत्सवाच्या काळात होणारी सोने-चांदीच्या दागिन्यांची विक्री यंदा 70 टक्क्यांनी घटली आहे.

सोनं जळगावपेक्षा पुण्यात महाग!

आज जळगावपेक्षा पुण्यात सोन्याचे दर अधिक असल्याचं पाहायला मिळत आहे. पुण्यातील सोन्याचा आददार दर प्रति तोळा 51 हजार 500 रुपये आहे. तर जळगावात सोने प्रतितोळा 51 हजार 37 रुपये आहे. कोल्हापूरचा विचार केला तर आज सोन्याचा भाव 51 हजार 100 रुपये प्रति तोळा आहे.

चांदीचा विचार केला तर मात्र पुण्यापेक्षा जळगावात चांदी खरेदी करणं स्वत: ठरेल. कारण, पुण्यात चांदीची किंमत प्रति किलो 65 हजार रुपये इतकी आहे. तर जळगावात चांदीला 67 हजार 506 रुपये प्रति किलो इतका दर आहे. तिकडे कोल्हापुरात चांदी 64 हजार रुपये प्रति किलो आजचा दर आहे.

मुंबईतील सोन्याचा दर

मुंबईतील सोने आणि चांदीच्या दराचा विचार केला तर मुंबई आज सोने प्रति तोळा 49 हजार 320 रुपये आहे. काल हेच सोनं 10 रुपयांनी स्वस्त होतं. गेल्या 10 दिवसातील मुंबईतील सोन्याचा दराचा विचार केला तर मुंबईत सोन्याच्या किमतीत चढउतार राहिला असला तरी फारसा फरक पडलेला दिसत नाही.

संबंधित बातम्या:

आनंदाची बातमी, सोने-चांदीच्या किंमतीत पुन्हा घसरण!

GOLD RATE | सोनं जळगावपेक्षा पुण्यात जवळपास साडे चारशे रुपयांनी महाग!

The reason behind the gold price hike

'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.