Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Golden Button: कला असावी तर अशी, ‘या’ युट्युबरच्या व्हिडीओला 20 कोटी व्ह्यू

एका दुर्गम नक्षलग्रस्त भागातील युट्युबरच्या व्हिडीओला तब्बल 20 कोटी लोकांनी पहिले. त्यांच्या कलेला जगभरातून पसंती मिळत आहे.

Golden Button: कला असावी तर अशी, 'या' युट्युबरच्या व्हिडीओला 20 कोटी व्ह्यू
हरजीत सिंह पप्पू Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Sep 24, 2022 | 7:39 PM

रायपूर,  नक्षलग्रस्त बस्तर येथे स्फोटकांचा आवाज स्थानिकांना परिचयाचा झाला असताना याच परिसरातून आता सारे जग  संगीत ऐकत आहे. बस्तरचा YouTuber हरजीत सिंह पप्पू (Harjit Singh Pappu) हा भारतातील पहिला कीबोर्ड प्लेयर आहे ज्याला YouTube कडून गोल्डन बटन पुरस्कार मिळाला आहे. कीबोर्डवरील त्यांची कलाकृती जगभरातील 20 कोटी लोकांनी पाहिली आहे. अवघ्या तीन वर्षांत 11 लाख 36 हजार लोकांनी त्याचे चॅनल सबस्क्राइब केले आहे.  हरजीत सिंग पप्पू शनिवारी, ज्येष्ठ गझल गायक पंकज उदास यांच्यासोबत, छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये कीबोर्ड प्लेयर म्हणून आले होते. पंकज उदास यांच्यासोबत हरजीत यांच्या कीबोर्डवरील साथीलाही प्रेक्षकांनी दाद दिली.

गुणवंत पत्नीची साथ

हरजित सिंग पप्पूची पत्नी वर्षा देवगुण हे देखील बस्तर क्षेत्रातील संगीत क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव आहे. त्यांनी बस्तर आणि इतर प्रांतातील सुमारे 24 प्रादेशिक बोलींमध्ये गाणी गायली आहेत. हरजीत आणि वर्षा यांनी हलबी, गोंडी, भात्री यासह अनेक बोलींमध्ये गाणी रेकॉर्ड केली आहेत. त्यांचे रेकॉर्ड केलेले हलबी गाणे ‘रण बेलो रे हुन तोरा तेलो’ हे देखील खूप प्रसिद्ध आहे.  त्यांची मुलं ओमी आणि रोमी यांना देखील संगीतात रुची आहे. ओमीच्या यूट्यूब चॅनलचेही अडीच लाख सबस्क्राइबर्स आहेत.

हे सुद्धा वाचा

बिना गुरूचा एकलव्य

हरजीत यांनी सांगितले की, 90 च्या दशकात, जेव्हा ते 18 वर्षांचे होते, तेव्हा त्यांनी साउंड सिस्टमवर काम करण्यास सुरुवात केली. ते  ऑर्केस्ट्रामध्ये कीबोर्ड वाजवत असे. हळूहळू त्यांना संगीताची आवड निर्माण होऊ लागली. यानंतर त्यांनी पैसे जमा केले आणि स्वतःचा कीबोर्ड प्लेअर विकत घेतला. कोणत्याही गुरूशिवाय ते स्वतः कीबोर्ड शिकले आणि त्यात प्रभुत्व मिळवले. नंतर स्थानिक कलाकारांना सोबत घेऊन डायमंड बेल्स म्युझिक ग्रुप तयार करण्यात आला. या ग्रुपमध्ये सुमारे 150 कलाकार आहेत, जे आता आपापल्या ठिकाणी प्रसिद्ध आहेत. त्यांनी दूरदर्शन, ऑल इंडिया रेडिओ आणि टीव्ही मालिकांना संगीत दिले आहे.

तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील
तहव्वुर राणाबाबत भारताला 5 नियम पाळावेच लागतील.
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत
तहव्वुर राणाला १८ दिवस एनआयएच्या कोठडीत.
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली
तरुणाने प्रश्न विचारला, पोलिसाने थेट तरुणाच्या कानशिलातच लगावली.
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले
प्रमोशन हवं असेल तर सरकार टिकलं पाहिजे, मुनगंटीवारांचे मिश्किल टोले.
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक
टायगर अभी जिंदा है.., एकनाथ शिंदेंकडून शहाजीबापू पाटलांचं कौतुक.
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न
शरद पवारांच्या आशीर्वादानं दादांच्या लाडक्या लेकांचा साखरपुडा संपन्न.
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप
'हे तर कलंक, या नालायकांनी...', वडेट्टीवारांचा मंगेशकर कुटुंबावर संताप.
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज
'आका' म्हणतो मला सोडा..वाल्मिक कराडचा निर्दोष मुक्ततेसाठी कोर्टात अर्ज.
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात
सुनील राऊतांना सिलेंडरची अंत्ययात्रा काढणं अन् हायवे रोखणं पडलं महागात.
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?
जय पवार यांचा साखरपुडा, शरद पवार हजेरी लावणार? बघा VIP मध्ये कोण-कोण?.