रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, आता येणार वंदेभारतचे हे नवे रूप
सध्या दहा वंदेभारत देशभर धावत असून वंदेभारतचा प्रवास लवकरच आणखी वेगवान होणार आहे. सध्याच्या वंदेभारत चेअरकार स्वरूपातील आहेत. लवकरच स्लीपर कोचवाल्या वंदेभारत येणार आहेत.
नवी दिल्ली : रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने नुकत्याच सुरू केलेल्या आलिशान वंदेभारत एक्सप्रेसच्या प्रवाशांना आता वंदेभारतमधून झोपून प्रवास करता येणार आहे. वंदेभारतच्या लवकरच स्लीपर कोच अवतारात येणार आहे. त्यामुळे या ट्रेनच्या वेगातही वाढ होणार आहे. सध्या देशभरात दहा वंदेभारत धावत आहेत. त्यानंतर शंभर वंदेभारत स्लीपर कोच अवतारातील असणार असून त्यांचा वेगही सध्याच्या वंदेभारतपेक्षा जादा असणार आहे.
जर तुम्ही वंदेभारतने प्रवास केला असेल किंवा करणार असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. रेल्वे मंत्रालयामार्फत वंदेभारतचा वेग वाढविण्यासंदर्भात गेले अनेक दिवस काम चालू आहे. सरकारची योजना साल 2024 पर्यंत 400 वंदेभारत चालविण्याची आहे. या ट्रेनमधून प्रवासाचा वेळ कमी होत आहे. आतापर्यंत देशात वेगवेगळ्या मार्गांवर दहा वंदेभारत सुरू आहेत. आता नविनच बातमी आली असून त्यानूसार आता एल्यूमिनियमची वंदेभारत ट्रेन लवकरच रूळांवर धावणार आहे. चेन्नईच्या इंटेग्रल कोच फॅक्ट्रीचे ( आयसीएफ ) माजी महाव्यवस्थापक सुधांशू मणि यांनी म्हटले आहे की येणाऱ्या दिवसात एल्युमिनियम ट्रेन तयार करण्याची योजना आहे. येत्या दिवसात 100 एल्युमिनियमच्या ट्रेन बनविण्यात येणार आहेत. रेल्वेची ही योजना गेमचेंजर ठरणारी आहे. अलिकडेच वंदेभारतसाठी 30 हजार कोटीच्या तांत्रिक निविदा काढण्यात आल्या आहेत. वंदेभारत ही विना इंजिनाची ट्रेन असून ती मेट्रो किंवा लोकलप्रमाणे चालविता येते तिला वेगळे स्वतंत्र इंजिन बसवण्याची गरज लागत नाही.
200 किमीचा वेग असणार
या नव्या ट्रेनचा वेग आधीच्या वंदेभारतपेक्षाही जास्त असणार आहे. एल्युमिनियम वंदेभारत प्रति तास २०० किमी वेगाने धावणार आहे. एल्यूमिनियम ट्रेन सध्याच्या ट्रेनपेक्षा वजनाने हलकी असणार आहे. त्यामुळे तिचा वेग आपोआपच वाढणार आहे.
एल्युमिनियम ट्रेनमध्ये असतील स्लीपर कोच…..
रेल्वे इक्विपमेंट तयार करणाऱ्या दोन प्रमुख कंपन्यांनी पार्टनर शिपमध्ये एल्युमिनियम ट्रेन सेट तयार करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. या एल्युमिनियम ट्रेन स्लीपर कोचवाल्या असतील. त्यानंतर शंभर मार्गांवर या नव्या एल्युमिनियम ट्रेन चालविण्यात येतील. रेल्वे मंत्रालयाने 2022 मध्ये वंदेभारतचे 2.0 मॉडेल सादर केले. त्याचा वेग आधीच्या वंदेभारतपेक्षा जादा होता. ही ट्रेन दरताशी 180 किमी एवढ्या वेगाने धावण्यासाठी सक्षम असली तरी तिला दर ताशी 160 किमी वेगाने चालविले जात आहे. एल्युमिनियम वंदेभारत दर ताशी 200 किमी वेगाने धावणारी असणार आहे. गुणवत्तेच्या बाबतीत ती राजधानी पेक्षा चांगली असणार आहे.