रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर,चोरीला गेलेला मोबाईल असा परत मिळणार
रेल्वे प्रवासात मोबाईल हरवल्यास त्यास परत मिळविणे महाकठीण काम असते. परंतू आता आरपीएफने दूरसंचार विभागाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर (सीईआयआर) पोर्टलशी करार केला आहे.

रेल्वे प्रवासात अलिकडे मोबाईल चोरण्याचा प्रकार खूपच वाढले आहेत. त्यामुळे प्रवाशांना आपला चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्याची काहीही खात्री नसते. या प्रकरणात आता रेल्वे सुरक्षा बलाने नवीन योजना आखली आहे. रेल्वे प्रवासात हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल शोधून काढण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) आता दूरसंचार विभागाशी हात मिळविला आहे. यानुसार आरपीएफने दूरसंचार विभागाच्या सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर ( सीईआयआर ) पोर्टलशी यशस्वी सामजंस्य करार केला आहे. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर रेल्वे ( एनएफआर ) मध्ये या पायलट प्रोग्रॅमला यश मिळाल्यानंतर आता भारतीय रेल्वे या निर्णय संपूर्ण भारतात लागू करणार आहे.
सीईआयआर पोर्टलवर आपली तक्रार
रेल्वे प्रवासात मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास त्याला परत मिळविणे महाकठीण काम असते. त्यामुळे कोट्यवधी प्रवाशांना याचा प्रवासांत अनेकदा अनुभव येत असतो. आपला हरवलेला मोबाईल फोन मिळविण्यासाठी प्रवासी रेल मदत किंवा 139 डायलद्वारे तक्रार करु शकतात. जर प्रवाशांना एफआयआर दाखल करायचा नसेल तर त्यांना सीईआयआर पोर्टलवर आपली तक्रार करण्याचा पर्याय देखील उपलब्ध असणार आहे.
सीईआयआर नोंदणीचा पर्याय निवडल्यानंतर आरपीएफच्या झोनल सायबर सेलच्या तक्रारीला सीईआयआर पोर्टलवर दाखल करेल. आणि आवश्यक माहिती नोंदवल्यानंतर संबंधित डिव्हाईसला ब्लॉक करण्यात येणार आहे. जर या अशा चोरीच्या मोबाईलमध्ये कोणी नवीन सिम टाकले तर फोनचा शोध लागणार असून आरपीएफ या फोन वापरणाऱ्या व्यक्तीला आरपीएफच्या नजीकच्या चौकीवर बोलावले जाणार आहे. तेथे त्याला तो फोन परत करावा लागणार आहे.




गायब झालेल्या फोनचा आयएमईआय नंबर ब्लॉक होणार
सीईआयआर पोर्टलच्या ट्रेनिंग कार्यक्रम प्रशिक्षणाच्या निमित्ताने दूरसंचार विभागासोबत मिळून सीईआयआर पोर्टलला संचालित करण्याच्या आरपीएफच्या सामजंस्य कराराने रेल्वे सुरक्षेत एक महत्वाचा टप्पा गाठला असल्याचे रेल्वे सुरक्षा दलाचे महासंचालक मनोज यादव यांनी म्हटले आहे.
चोरीला गेलेल्या फोनला वेगाने रिकव्हर करणे शक्य
सीईआयआर पोर्टल हा मोबाईल फोनला परत मिळविण्यासाठीचा एक महत्वपूर्ण डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जो हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या मोबाईल उपकरणांना ब्लॉक करण्यासाठी, ट्रॅक करण्यासाठी आणि प्रबंधित करण्यासाठी डिझाईन केला आहे. त्यामुळे आरपीएफ आता हरवलेल्या आणि गायब झालेल्या मोबाईल फोनच्या आयएमईआय क्रमांकाला ब्लॉक करुन संबंधित फोन निष्क्रीय करणार आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या निष्क्रीय मोबाईल फोन बाळगणाऱ्या किंवा त्याची पुनर्विक्री करण्यास प्रतिबंध लागणार आहे. तसेच प्रगत ट्रॅकींग क्षमतेने हरवलेल्या फोनला वेगाने रिकव्हर करणे शक्य होणार आहे.
८४.०३ कोटी रुपयांच्या वस्तू मिळविल्या
आरपीएफने “ऑपरेशन अमानत” मोहिम सुरू केली असून त्याद्वारे मौल्यवान वस्तू त्यांच्या खऱ्या मालकांना परत करण्यास सुरुवात केली आहे. “ऑपरेशन अमानत” मोहिमेंतर्गत जानेवारी २०२४ ते फेब्रुवारी २०२५ दरम्यान, आरपीएफने ८४.०३ कोटी रुपयांच्या हरवलेल्या किंवा विसरलेल्या वस्तू परत मिळवल्या आणि १.१५ लाखांहून अधिक प्रवाशांना त्या परत केल्या आहेत.