गोमांसाच्या संशयावरुन झाडाला बांधून बेदम मारहाण
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा गोहत्येच्या संशयावरुन बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोरक्षकांना गायीच्या मासांची तस्करीच्या संशयावरुन तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली. या तथाकथित गोरक्षकांनी महिलेसह तीन जणांना बेदम मारहाण केली. सिवनी येथे ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडीओ दोन-तीन दिवसापूर्वीचा असल्याचे सांगितलं जात आहे. एका रिक्षातून काहीजण गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती या गोरक्षकांना […]
भोपाळ : मध्य प्रदेशमध्ये पुन्हा एकदा गोहत्येच्या संशयावरुन बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. गोरक्षकांना गायीच्या मासांची तस्करीच्या संशयावरुन तरुणाला झाडाला बांधून मारहाण केली. या तथाकथित गोरक्षकांनी महिलेसह तीन जणांना बेदम मारहाण केली. सिवनी येथे ही धक्कादायक घटना घडली. हा व्हिडीओ दोन-तीन दिवसापूर्वीचा असल्याचे सांगितलं जात आहे.
एका रिक्षातून काहीजण गोमांस घेऊन जाणार असल्याची माहिती या गोरक्षकांना मिळाली होती. त्यांनी संबंधितांना पकडून बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडीओही शूट करण्यात आला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये लोक जय श्री रामचे नारे देताना दिसत आहेत.
मध्यप्रदेशातील डुंडा सिवनी येथील हा व्हिडीओ आहे. तीन लोकांकडे जे मांस मिळाले, गायीचे मांस असल्याचा संशय आहे. मात्र या कथित गोरक्षकांनी पोलिसांना सूचना न देता गुंडगिरी करत स्वत:च मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्या तरुणांकडून त्यांच्यासोबत असलेल्या महिलेलाही चपलेने मारण्यास सांगितले.
याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरु असून अधिक तपास सुरु आहे. हा व्हिडीओ समोर आल्यावर एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला.
This is how Muslims are treated by Vigilantes created by Modi voters welcome to a New India which will Inclusive and as @PMOIndia said Secularism Ka Niqaab …… https://t.co/Cy2uUUTirk
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 24, 2019