Government Job 2020: बँक, पोलीस, पोस्ट विभागांमध्ये देशभरात 28000 पदांसाठी बंपर भरती

देशभरात विविध सरकारी विभागांमध्ये तरुणांसाठी जवळपास 28000 पदांच्या भरतीची सुवर्ण संधी आहे (Government job recruitment 2020).

Government Job 2020: बँक, पोलीस, पोस्ट विभागांमध्ये देशभरात 28000 पदांसाठी बंपर भरती
Follow us
| Updated on: Jul 14, 2020 | 10:40 AM

Government Job Updates 2020 नवी दिल्ली : देशभरात विविध सरकारी विभागांमध्ये जवळपास 28000 पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे (Government job recruitment 2020). यात रेल्वे, पोस्ट विभाग, पोलीस अशा विविध सरकारी खात्यांचा समावेश आहे. यामुळे ऐन लॉकडाऊनच्या काळात नोकरीच्या शोधात असलेल्या बेरोजगार तरुणांना ही मोठी संधी असणार आहे.

राजस्थानमध्ये 2177 पदांसाठी भरती

RSMSSB Recruitment 2020: राजस्थानमध्ये सरकारी नोकरीची वाट पाहणाऱ्या तरुणांसाठी सुवर्ण संधी आहे. राजस्थान सरकारने (RSMSSB) 2100 पेक्षा अधिक जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु केली आहे. या प्रक्रियेनुसार इच्छुकांची लेखी परीक्षा घेऊन त्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांना 30 जुलै 2020 पर्यंत अर्ज करता येणार आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बँकांमध्ये 1850 पदांसाठी भरती

Banking Associate Recruitment 2020: जम्मू काश्मीर बँकेने बँकिंग असोसिएट आणि प्रोबेशनरी ऑफिसर (PO) या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीतून 1850 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुकांना ऑनलाइन अर्ज करावा लागणार आहे. याची प्रक्रिया सुरु झाली आहे.

IBPS RRB Recruitment 2020: 43 बँकांमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. इंस्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सनल सिलेक्शनने (IBPS) 9638 रिक्त जागांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै 2020 आहे.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

पोस्ट विभागातील भरती

भारतीय पोस्ट विभागात (India Post) 3200 पेक्षा अधिक रिक्त जागांसाठी भरती होत आहे. यासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. राजस्थान पोस्टल सर्कलमध्ये ही भरती होत आहे. या भरतीतून ग्रामीण पोस्ट सेवकांच्या (GDS) पदांसाठी भरती होत आहे. या भरतीसाठी 10 वी उत्तीर्ण असणे ही शैक्षणिक पात्रता आहे.

काश्मीरमध्ये 8575 पदांसाठी भरती

JKSSB Recruitment 2020: जम्मू आणि काश्मीर सेवा निवड मंडळाने (JKSSB) 8,575 पदांसाठी भरती प्रक्रिया काढली आहे. या अंतर्गत वर्ग 4 पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. 40 वर्षांपर्यंतचे उमेदवार यासाठी अर्ज करु शकणार आहेत. निवड झालेल्या उमेदवारांना 47,100 रुपये प्रति महिन्यापर्यंत वेतन मिळणार आहे.

बिहारमध्ये 1050 पदांसाठी सरकारी भरती

Bihar CHO Recruitment 2020: बिहारमध्ये स्टेट हेल्थ सोसायटीने (SHS) 1050 पदांसाठी भरती काढली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना 14 जुलै 2020 पर्यंत अर्ज करायचे आहेत. म्हणजेच या भरतीसाठी आज शेवटा दिवस आहे. निवड झाल्यास उमेदवारांना 25, 000 रुपये प्रति महिना वेतन मिळणार आहे.

SSC भरती

Delhi Police Recruitment 2020: कर्मचारी निवड आयोगाने (SSC) सेंट्रल आर्म्ड पोलीस फोर्स (CAPF) आणि दिल्ली पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यात अनेक पदांसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. यात पोलीस उपनिरीक्षक पदासाठी देखील उमेदवारांची निवड होणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 जुलै 2020 आहे. या भरती अंतर्गत एकूण 1564 पदांची भरती होणार आहे.

सूचना : नोकर भरतीबाबतची अधिक माहिती, नियम-अटी आणि प्रक्रियेसाठी  सरकारच्या संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवरील तपशील पाहावा.

हेही वाचा :

Amazon India : अ‍ॅमेझॉनकडून मोठी घोषणा, भारतात 20 हजार नोकऱ्या उपलब्ध करणार

पुण्यात आठवडाभरात 5700 प्रवासी परतले, बिहारमधून दररोज जवळपास 400 लोक पुण्यात

Lockdown Effect : पुण्यातील 68 हजार आयटी कर्मचारी चिंतेत, पगार आणि कामगार कपातीचे संकट

Government job recruitment 2020

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.