PM किसान योजनेचा 12 वा हफ्ता लवकरच खात्यावर…; हे काम राहिलं असेल तर लवकर करुन घ्या…
ज्यांच्या खात्यावर अद्याप 2000 रुपये आलेलेही नाहीत. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी झाली नसल्याने त्याचा लाभही काही शेतकऱ्यांना घेता आला नाही.
नवी दिल्लीः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑगस्ट रोजी ‘पीएम किसान सन्मान निधी’ योजनेचा 12 वा हप्ता जाहीर केला होता. या योजनेंतर्गत 16,000 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार असल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते. यावेळी सुमारे 8 कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ मिळाला आहे. मात्र त्यानंतरही देशातील अनेक शेतकरी असे आहेत की, ज्यांच्या खात्यावर अद्याप पैसेच आलेले नाहीत.
तरीही ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत, त्यांनी काळजी करण्याचीही गरज नाही. कारण 30 नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत.
पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत, केंद्र सरकार कमी जमीनधारक आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना वर्षभरात 6 हजार रुपये देत असते.
या योजनेचा हफ्ता दर चार महिन्यांनी तीन हप्त्यांमध्ये दिले जातो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्यानंतर हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जातो.
मात्र काही वेळा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा झालेले नाही अशी प्रकरणंही घडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ घेता आला नाही.
केंद्र सरकारने ‘पीएम किसान सन्मान निधी’चा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य केले होते. अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी माहिती नसल्यामुळे ई-केवायसी केले नाही. त्यामुळे या स्थितीत सुमारे 2.62 कोटी शेतकरी 12 व्या हप्त्यांपासून वंचित राहिले होते.
त्यांच्या खात्यावर अद्याप 2000 रुपये आलेलेही नाहीत. तर काही शेतकऱ्यांच्या जमिनीची पडताळणी झाली नसल्याने त्याचा लाभही काही शेतकऱ्यांना घेता आला नाही.
तर काही शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घेतले होते, तरीही त्यांच्या खात्यात बाराव्या हप्त्याचे पैसे जमा झाले नव्हते. त्यामुळेच शेतकऱ्यांनी आता कृषी विभागाच्या कार्यालयात जाऊन जमिनीची पडताळणी करून घेणे गरजेची आहे. जमिनीच्या पडताळणीसाठी शेतकऱ्याला त्यांची जमिनीबाबतची माहिती द्यावी लागणार आहे.
परंतु असे काही शेतकरी आहेत ज्यांनी ई-केवायसी आणि जमीन पडताळणी दोन्ही केली होती, तरीही त्यांच्या खात्यात 12 वा हप्ता आलेला नाही.
अशा शेतकऱ्यांनी नोंदणी करताना काही चुकीची माहिती दिली असल्यामुळेच त्यांचे पैसे आले नसावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.
ज्यांना समस्या आहे त्यांनी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन त्याची माहिती तपासून बघावी असे आवाहनही करण्यात आले आहे.