सरकारने फेकन्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनलचा भंडाफोड केला

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने भारतात खोटी माहिती पसरवणाऱ्या सहा YouTube चॅनेलचा भंडाफोड केला आहे.

सरकारने फेकन्यूज देणाऱ्या युट्यूब चॅनलचा भंडाफोड केला
PIB
Image Credit source: PIB
| Updated on: Jan 12, 2023 | 6:36 PM

दिल्ली : केंद्रीय माहिती प्रसारण खात्याने फेकन्यूज पसरणाऱ्या सहा युट्यूब चॅनलचा (YouTube) छडा लावला आहे. फेक न्यूजमुळे समाजात तेड निर्माण केली जात असून त्यामुळे सामाजिक सौहार्दाला तडा जात आहे. केंद्र सरकारने खोटी माहिती पसरविणाऱ्या युट्यूब चॅनलना धडा शिकविण्यासाठी आता त्यांची झाडाझडती सुरू केली आहे. सरकारने असे सहा युट्यूब चॅनल शोधले असून त्यानी पसरविलेल्या शेकडो व्हीडीओंना 50 कोटी व्यूव्ज जनरेट केले होते.

केंद्रीय माहिती प्रसारण खात्याच्या फॅक्ट चेक टीमने देशात खोट्या बातम्या पसरविणाऱ्या सहा युट्यूब चॅनलचा शोध घेतला आहे. या चॅनलचा माग घेण्यासाठी ट्वीटर थ्रेडचा वापर करण्यात आला आहे. या सहा युट्यूब चॅनलचे 20 लाख सबस्क्रायबर असून 51 कोटी व्यूज त्यास मिळाले आहेत. त्यामुळे अशा चॅनलना बंदी घालण्यात येणार आहे.

संवाद टीव्ही, नेशन टीव्ही, सरोकार भारत, नेशन 24, स्वर्णिम भारत आणि संवाद समाचार ही सहा युट्यूब चॅनेल देशभरात फेक न्यूज पसरवत असल्याचे आढळून आले, त्यांचे जवळपास 20 लाख सदस्य होते आणि त्यांचे व्हिडिओ 51 हून अधिक पाहिले गेले आहेत. संवाद समाचार, संवाद टीव्ही आणि नेशन टीव्ही या चॅनेलने त्यांची नावे बदलून अनुक्रमे इनसाइड इंडिया, इनसाइड भारत आणि नेशन वीकली अशी केली असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.