मोठी बातमी, सरकारने महागाईवर उपाय शोधला…

दूध, मका आणि सोयाबीन तेलाचे भाव वाढतेच राहण्याची शक्यता आहे. तर सरकार मक्यासारख्या वस्तूंवरील कर दर कमी करत आहे, तर इंधनावरील कर पुन्हा कमी करण्याची शक्यता आहे.

मोठी बातमी, सरकारने महागाईवर उपाय शोधला...
Follow us
| Updated on: Feb 15, 2023 | 5:56 PM

नवी दिल्लीः देशात महागाईने आता कहर केला आहे, किरकोळ महागाईही प्रचंड वाढत चालली आहे. जानेवारी 2023 मध्ये, 6.52 टक्के दराने होता, जो भारतीय रिझर्व्ह बँकेच्या 6 टक्के कमाल मर्यादेपेक्षाही जास्त आहे. या परिस्थितीत महागाई नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने आता लवकरच पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करणार असल्याचे बोलले जात आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एका औद्योगिक संघटनेच्या कार्यक्रमात बोलताना याचे संकेत दिले आहेत. जर राज्यांनी सहमती दर्शवली तर सरकार पेट्रोलियम उत्पादने जीएसटीच्या कक्षेत आणणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शनिवारी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वीच त्यांनी हे वक्तव्य केल्याने त्याची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन बुधवारी पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री या उद्योग संघटनेच्या सदस्यांना संबोधित करत होत्या.

यावेळी त्यांना पेट्रोलियम पदार्थांना जीएसटीच्या कक्षेत आणण्याबाबत सवाल उपस्थित केल्यानंतर त्यांनी काही गोष्टी स्पष्ट केल्या.

कराबाबत राज्यांमध्ये करार झाला तर या दिशेने पावले उचलली जाऊ शकतात. त्याबरोबरच सरकार राज्यांना विजेसह विविध क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे.

तर त्याचबरोबर ‘एक देश, एक रेशन कार्ड’ प्रणाली लागू करण्यासाठीही त्यांना प्रोत्साहन दिले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

देशातील महागाईचा उच्चांक असतानाच सरकारने पेट्रोल-डिझेल आणि इतर इंधनावरील कर कमी करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे.

तर किरकोळ महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकार इंधनावरील कर दर कमी करू शकते असे रॉयटर्सने दिलेल्या अहवालामध्ये स्पष्ट केले आहे.

सरकार पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याचा निर्णय मार्चमध्ये घेणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तोपर्यंत फेब्रुवारीची किरकोळ महागाईची आकडेवारीही येणार असल्याचे काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

जानेवारी 2023 मध्ये किरकोळ महागाईचा दर 6.52 टक्के होता, तर गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये तो 5.72 टक्के होता. एवढेच नाही तर महागाईचा परिणाम खाद्यपदार्थांच्या किमतीवर राहणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे.

दूध, मका आणि सोयाबीन तेलाचे भाव वाढतेच राहण्याची शक्यता आहे. तर सरकार मक्यासारख्या वस्तूंवरील कर दर कमी करत आहे, तर इंधनावरील कर पुन्हा कमी करण्याची शक्यता आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.