सूरत : सोशल मीडियावर एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होतोय. 8 जून रोजी एक आमदार महिलेसोबत हॉटेलमध्ये आला होता. गुजरातच्या विसावदर विधानसभा क्षेत्राचा हा आमदार आहे. भूपेंद्र भाई ऊर्फ भूपत भाई भयानी असं या आमदाराच नाव आहे. भूपेंद्र भाई सूरतच्या कडोदरा भागातील एका हॉटेलमध्ये विवाहित महिलेसोबत आले होते. आमदाराने महिलेसोबत हॉटेलच्या रुममध्ये प्रवेश केला होता. तितक्यात काही वेळात महिलेचा पती तिथे आला.
हा व्हायरल व्हिडिओ सूरतच्या कडोदरा भागतील सूरज गेस्ट हाऊसचा असल्याच म्हटलं जातय. जूनागढच्या विसावदर विधानसभा क्षेत्राचे आमदार भूपत भाई भयानी हॉटेलच्या काऊंटरजवळ उभे असलेले दिसतायत. आजतकने हे वृत्त दिलं आहे.
चेहरा ओढणीने झाकलेला
गेस्ट हाऊसच्या काऊंटरवर बसलेली व्यक्ती रजिस्टरमध्ये नोंद करताना व्हिडिओमध्ये दिसतोय. आमदाराच्या शेजारीच महिला उभी आहे. तिने आपला चेहरा ओढणीने झाकलेला होता.
व्हायरल व्हिडिओमध्ये काय आहे?
रजिस्टरमध्ये एंट्री झाल्यानंतर आमदार महाशय महिलेसोबत गेस्ट हाऊसमधील रुमच्या दिशेने निघाले. रुममध्ये त्यांनी प्रवेश केला. तितक्यात त्यांच्या मागोमाग महिलेचा पती तिथे पोहोचला. महिलेचा पती दिसताच भूपत भाई भयानी यांनी आपला चेहरा रुमालाने झाकून घेतला व तिथून निघून गेले. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ 8 जून 2023 चा असल्याच म्हटलं जातय.
आमदार या व्हिडिओवर काय म्हणाला?
या व्हायरल व्हिडिओवर भूपत भयानी यांची प्रतिक्रिया आली आहे. “हे हीन प्रकारच राजकारण आहे. मी जनतेची सेवा करतो आणि पुढेही करत राहीन. ज्यांना माझ काम पाहवत नाही. त्यांनी मला बदनाम करण्यासाठी हे सर्व केलय” असं आमदार भूपत भयानी म्हणाले.
Gujarat: AAP MLA Bhupat Bhayani allegedly caught in a Surat hotel with a married woman. The MLA reportedly fled from the scene when the woman’s husband arrived.#AapKePaap #KejriwalExposed
Via @AngrySaffron pic.twitter.com/PmaI7CrFXZ— Debashish Sarkar ?? (@DebashishHiTs) June 22, 2023
किती रुपयांना रुम बूक केला?
सूत्रांच्या माहितीनुसार, भूपत भाई भयानी जवळपास 50 मिनिट या हॉटेलच्या रुममध्ये थांबले होते. त्यांनी 800 रुपये भाडं सुद्धा दिलं होतं. महिलेच्या नवऱ्याल गेस्ट हाऊसमध्ये पाहताच ते गडबडून गेले. चेहरा झाकून तिथून गपचूप निघून गेले. या व्हिडिओमुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.