नवी दिल्लीः दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्ता मिळवल्यानंतर गुजरातमधील विजयावर स्वार होण्यासाठी आम आदमी पक्षाकडून आता जोरदार तयारी केली जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) आणि पक्षाचे इतर वरिष्ठ नेत्यांनी आता सक्रिय होत गुजरातमध्ये (Gujarat Election) प्रचाराचा जोरदार धडाका लावला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी रविवारी गुजरातमध्ये एका जाहीर सभेत बोलताना सांगितले की, आगामी निवडणुकीनंत गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचेच सरकार स्थापन होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बोलताना गुजरातच्या नागरिकांना सांगितले की, तुमच्या प्रेमाला आणि तुमच्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाहीस हा माझा विश्वास असल्याचेही त्यांनी सांगितले.
गुजरात आता भाजपच्या 27 वर्षांच्या राजवटीला ते कंटाळले आहे. यावेळी बोलताना त्यांनी आयबीच्या अहवालाचा संदर्भ देत सांगितले की, मी तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन आलो असून गुजरातमध्ये आपचे सरकार बनणार असून ते सध्या काठावर विजय मिळवत आहे. सध्या 92-93 जागा मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
त्यामुळे ते म्हणाले की, 150 जागा येण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 8 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून 15 डिसेंबरला आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन होणार असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, गुजरातमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंत 31 डिसेंबरपर्यंत सर्व प्रकारच्या आंदोलकांवर आणि कर्मचाऱ्यांवर जे खटले दाखल केले गेले आहेत, ते खटले मागे घेतले जातील.
हा निर्णय सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा हाच निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
दुसरी गोष्ट आपण गुजरातमधील भ्रष्टाचार संपवून टाकणार आहे. कारण गुजरातमध्ये भ्रष्टाचार इतका वाढला आहे की, राज्याचे बजेट तुटीत चालले आहे.
गुजरातमध्ये वार्षिक अडीच लाख कोटी रुपयांचे बजेट आहे. अनेकांकडे कोट्यवधी रुपये आहेत, मात्र तुमच्या भागात रस्ता, शाळा, हॉस्पिटल देण्यात आली का ?
महाविद्यालयं निर्माण केली का? हा सर्व पैसे गेला कुठे? ज्यांचे सरकार आहे त्यांनी खाल्ले आहेत त्यामुळे आपचे सरकार गुजरातमध्ये येण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
आपचे सरकार आले तर पहिल्यांदाच गुजरातला भ्रष्टाचारमुक्त सरकार मिळणार आहे. त्यामुळे आता कोणी भ्रष्टाचार केला तर सरळ तुरुंगात जाईल, भगवंत मान यांनीही नुकतेच एका मंत्र्याला पकडून तुरुंगात टाकले आहे.
त्यामुळे 15 डिसेंबरनंतर तुमचे कोणतेही काम हे लाच दिल्याशिवाय होणार असल्याचा विश्वास त्यांनी गुजरातच्या नागरिकांना दिला आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री म्हणाले, 1 मार्चपासून दिल्ली आणि पंजाबप्रमाणे गुजरातच्या लोकांचे बिलही शून्यावर येणार आहे. जुनी थकीत बिलेही माफ करणार आहोत. त्यामुळे गुजरातमधील काही लोकं मला शिव्या देतील की केजरीवाल आम्हाला फुकट देत आहे म्हणून.