Hospital Fire | हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, जीव वाचवण्यासाठी रुग्णांची एकच धावपळ

Hospital Fire | रुग्णालयात लागलेल्या या आगीमुळे रुग्णांची जीव वाचवण्यासाठी एकच धावपळ झाली. तसेच रुग्णालयाला आग लागल्याचं कळताच रुग्णांच्या नातेवाईकांचीही धाकधूक वाढली.

Hospital Fire | हॉस्पिटलमध्ये अग्नितांडव, जीव वाचवण्यासाठी रुग्णांची एकच धावपळ
Follow us
| Updated on: Jul 30, 2023 | 10:51 AM

अहमदाबाद | या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. रुग्णालयाला भीषण आग लागल्याचं समजतंय. रुग्णालयात आग लागल्याने आपला जीव वाचवण्यासाठी रुग्णांसह कर्मचाऱ्यांचीही एकच धावाधाव पाहायला मिळाली. तसेच आग संपूर्ण रुग्णालयात पसरल्याने रुग्णांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागला. तसेच या आगीमुळे अतिदक्षता अर्थात आयसीयूत असलेल्या रुग्णांनाही श्वास कोंडीचा सामना करावा लागला.

गुजरातमधील अहमदाबाद शहरातील शाहीबाग भागातील राजस्थान हॉस्पिटलला आग लागल्याची माहिती मिळाली आहे. रुग्णालयाच्या तळमजल्याला ही आग लागली. पाहता पाहता आग ही पसरली. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाने घटनास्थळी पाचारण केलं. फायर ब्रिगेडच्या एकूण 22 गाड्या घटनास्थळी पोहचल्या आणि बचावकार्यासह आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांचाही जीव टांगणीला लागला.

रुग्णालयाला आग

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवतहाणी झाली नाही. वेळीच 100 रुग्णांना सुरक्षितरित्या हॉस्पिटलमधून बाहेर काढलं. तर खबरदारी म्हणून रुग्णांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.

“रुग्णालयातील दुसऱ्या तळमजल्यावर ही आग लागली. तळमजल्यावर दुरुस्तीचं काम सुरु होतं. या दरम्यान ही आग लागली. आगीचं कारण अजूनही समजू शकलेलं नाही”, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अधिकारी काय म्हणाले?

“राजस्थान हॉस्पिटलला सकाळी जवळपास 4 वाजून 30 मिनिटांनी ही आग लागली. पाहता पाहता आग पसरली. संपूर्ण रुग्णालयात धुर पसरला. आम्हाला माहिती मिळताच आम्ही घटनास्थळी पोहचलो. रुग्णांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. तसेच आमच्या 20-25 जवानांनी शर्थीचे प्रयत्न करुन आगीवर नियंत्रण मिळवलंय. मात्र आगीचं कारण काय याचा आम्ही शोध घेत आहोत”,अशी प्रतिक्रिया अग्निशमन अधिकारी जयेश खादिया यांनी दिली.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.