जेठाभाईंना आता कोण म्हणणार नाही ते कधी काळी आमदार होते, आता एक वेळचं अन्न मिळणंही झालय कठीण
आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनसाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. दीर्घकाळ लढा दिल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजून निकालही दिला होता. मात्र तरीही आजपर्यंत त्यांना कोणतीही पेन्शन मिळाली नाही. त्यामुळे आजही त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांची पाच मुले मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
मुंबईः गुजरातमधील जेठाभाई राठोड (Former MLA Jethabhai Rathod) म्हणजे माजी आमदार. कधी काळी त्यांच्या नावाला राजकारणात वलय प्राप्त होतं, तर आता मात्र एका माजी आमदाराच्या आयुष्यात फक्त जगण्यासाठी संघर्ष सुरू झाला आहे. म्हातारपणातील आयुष्यातील दिवस घालवण्यासाठी आता त्यांना सरकारकडे पेन्शनसाठी याचिका करावी लागत आहे. पेन्शनसाठी त्यांना फक्त अर्जच केला आहे असं नाही तर, त्या हक्काच्या पेन्शनसाठी (Pension) न्यायालयाचे उंबरेही झिजवावे लागले आहेत. त्यानंतर न्यायालयाकडून आदेश (Court Order) देऊनही त्यांना अजून पेन्शन मिळाली नाही.
ते स्वतः बीपीएल शिधापत्रिकेच्या साहाय्यानेच जगत असतात, तर त्यांची सगळीच मुलं ही मजुरीचं काम करुन आपलं आयुष्य घालवत आहेत.
कोण म्हणणार नाही आमदर होते…
आजकाल साध्या सरपंचाकडेही अगदी मंत्र्यांसारख्या कार आणि जीप आहेत. काही लोकप्रतिनिधींकडे कोट्यवधी रुपयांच्या गाड्या आहेत. तर आजच्या काळातील काही आमदारांना तर लाखांचा पगार-पेन्शनही कमी वाटू लागत आहे, पण गुजरातचे माजी आमदार जेठाभाई राठोड यांची कहाणीत संघर्षाशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. त्यांना ना आता पेन्शन मिळते आहे ना सरकारकडून विशेष आर्थिक साहाय्य.
आमदारकीचा प्रचार सायकलवरून
गुजरातच्या साबरकांठा जिल्ह्यातील टेबरा या छोट्याशा गावात राहणारे जेठाभाई राठोड यांनी 1967 मध्ये खेडब्रह्मा विधानसभेत अपक्ष उमेदवार म्हणून काँग्रेसच्या विरोधात 17,000 मतांच्या फरकाने विजयी झाले होते, त्यावेळी त्यांनी आपला प्रचार सायकलवरून केला होता. जेठाभाई खेडब्रह्माहून गांधीनगरला ते सरकारी बसनेच जात होते असं त्यांना ओळखणारी माणसं सांगतात. ते ज्या काळात लोकप्रतिनिधी म्हणून काम करत होते, त्याकाळा त्यांनी सायकलवरून फिरून अनेकांच्या सुख दुःखात ते सहभागी झाले होते. त्याकाळात त्यांनी कित्यके जणांना मदत केली होती, तर आता मात्र ते स्वतःच मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. कारण आजही ते माजी आमदार असतानाही त्यांना कोणतीही मदत मिळत नाही.
आपल्याच पेन्शनसाठी न्यायालयात दाद
आपल्याला मिळणाऱ्या पेन्शनसाठी त्यांनी न्यायालयात दाद मागितली होती. दीर्घकाळ लढा दिल्यानंतर न्यायालयाने त्यांच्या बाजून निकालही दिला होता. मात्र तरीही आजपर्यंत त्यांना कोणतीही पेन्शन मिळाली नाही. त्यामुळे आजही त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांची पाच मुले मोलमजूरी करून आपला उदरनिर्वाह करत आहेत.
शिधापत्रिकेच्या धान्यावरच आपला उदरनिर्वाह
जेठाभाई माजी आमदार असले तरी आजही त्यांच्या कुटुंबाला बीपीएल शिधापत्रिकेच्या धान्यावरच आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. ज्या आमदाराने वाईट काळात जनतेचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न केला, अनेकांचे अश्रू पुसले असले तरी आज मात्र त्यांचं दुःख हलकं करण्यासाठी कोणीही नाही. त्यामुळे त्यांनी सरकारकडे मदत मिळावी म्हणून मागणी केली आहे.
जेठाभाई राठोड यांची अवस्था दयनीय
सध्याच्या काळातील सरपंचही ऐशोआरामी जीवन जगतात, आमदाराचा एका महिन्याचा पगार 2 लाख ते 2.5 लाखापर्यंत आहे, पाच वर्षाच्या काळात सुमारे 12 कोटी रुपयांची उलाढाल एका आमदारावर होते, तरीही गुजरातमधील माजी आमदार म्हणून जेठाभाई राठोड यांची अवस्था दयनीय अशीच आहे.