Rahul Gandhi | राहुल गांधी यांना जेलमध्ये जावं लागणार? गुजरात हायकोर्टाचा नेमका निकाल काय?

न्यायालयात केलेल्या अपीलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही याचिका सत्र न्यायालयात फेटाळली. त्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं. यावर आज सुनावणी पूर्ण झाली.

Rahul Gandhi | राहुल गांधी यांना जेलमध्ये जावं लागणार? गुजरात हायकोर्टाचा नेमका निकाल काय?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 6:40 PM

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या अपिलावर गुजरात उच्च न्यायालयात आज सुनावणी पूर्ण झालीय. न्यायालयाने आपला निर्णय राखून ठेवलाय. विशेष म्हणजे गुजरात उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना तात्काळ दिलासा देण्यास नकार दिलाय. न्यायालयाचा निर्णय आता न्यायालयाच्या उन्हाळी सुट्टीनंतर येणार असल्याची माहिती समोर आली आहे. सुरत न्यायालयाने दिलेल्या 2 वर्षाच्या शिक्षेला स्थगिती द्यावी ही याचिका सत्र न्यायालयाने फेटाळल्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं होतं. त्यावर आज सुनावणीला पूर्ण झाली.

राहुल गांधी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. 23 मार्चला सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना ‘मोदी’ नावावर केलेल्या टिपण्णीवर 2 वर्षाची सजा सुनावली होती. त्यानंतर त्यांचं लोकसभा सदस्यपद देखील गेलं होतं. त्यानंतर राहुल गांधी यांनी सुरत सत्र न्यायालयात या संदर्भात अपील केलं होतं.

न्यायालयात केलेल्या अपीलमध्ये कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या शिक्षेला स्थगिती द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. ही याचिका सत्र न्यायालयात फेटाळली. त्यानंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात अपील केलं आहे. यावर न्यायाधीश गीता गोपी यांनी राहुल गांधी यांच्या केसमधून माघार घेतली होती. त्यानंतर न्यायमूर्ती हेमंत प्रच्छक यांच्यासमोर सुनावणीला पूर्ण झाली. त्यांनी आज निर्णय राखून ठेवला.

हे सुद्धा वाचा

या प्रकरणात याचिकाकर्ते पुर्णेश मोदी यांना न्यायालयाने नोटीस बजावली होती. या प्रकरणावर पुर्णेश मोदी यांनी न्यायालयाला आपलं म्हणणं सादर करत ही हार जीतची लढाई नाही. ही समाजिक लढाई असल्याचं म्हटलं आहे.

काय आहे प्रकरण?

राहुल गांधी यांनी कर्नाटक येथील एका रॅलीत 13 एप्रिल 2019 ला ललित मोदी, निरव मोदी, नरेंद्र मोदी यांची नाव कॉमन का आहेत? सगळ्या चोराचे नाव मोदी का असतं? असं विधान केलं होतं. यावर भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. यावर राहुल गांधी यांना न्यायालयाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

दरम्यान, राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे संपूर्ण देशात काँग्रेसकडून निषेध व्यक्त करण्यात आला. महाराष्ट्रातही केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. विशेष म्हणजे राहुल गांधी यांच्यावरील या कारवाईमुळे त्यांना आगामी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळेल का? याबाबत साशंकता असल्याची चर्चा आहे. या सगळ्या घडामोडींनंतर राहुल गांधी यांनी गुजरात उच्च न्यायालयात शिक्षा स्थगित करण्यासाठी अपील केलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.