मुंबई: गुजरातमध्ये (Gujarat) सामाजिक सलोख्याच एक उद्हारण समोर आलय. गुजरातच्या पाटण जिल्ह्यात सिद्धपूर तालुक्यात देठली गावात चामुंडा मातेचं (Chamunda Mata) एक जुन मंदिर आहे. अलीकडेच या मंदिराच नूतनीकरण करण्यात आलं. त्यासाठी 1 कोटी रुपये खर्च करण्यात आले. याच देठली गावात राहणाऱ्या मुस्लिमांनी (Muslims) मंदिराच्या नूतनीकरणाला हातभार लावलाय. त्यांनी मंदिराच्या नूतनीकरणासाठी 11 लाख रुपयांची देणगी दिली.
सेवाकार्य सुद्धा केलं
फक्त देणगी देऊन मुस्लिम बांधव थांबले नाहीत. त्यांनी तिथे स्वेच्छेने सेवाकार्य सुद्धा केलं. मंदिराच्या व्यवस्थापनाने तीन दिवसासाठी यज्ज्ञ आयोजित केला होता. तिथे गावातील मुस्लिमांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मोफत चहा वाटप केलं.
किती देणगी दिली?
गावातील स्थानिक नेते अकबर मोमीन यांनी सांगितलं की, “वर्षभरापूर्वी मंदिर व्यवस्थापनाने मंदिर नूतनीकरणाचा निर्णय घेतला. त्यावेळी गावातील मुस्लिम समुदायाने एकत्र निधी जमवण्याचा निर्णय घेतला. त्या सर्वांनी एकत्र येऊन 11 लाख 11 हजार 111 रुपयाची देणगी मंदिर ट्रस्टकडे सुपूर्द केली” टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलय.
गावात किती टक्के मुस्लिम?
देठली गावची लोकसंख्या 6 हजारच्या घरात आहे. यात 30 टक्के मुस्लिम आहेत. “आम्ही सर्व इथे सलोख्याने राहतो. आमच्यात कुठलेही वाद नाहीत” असं अकबर मोमीन यांनी सांगितलं.
मंदिर व्यवस्थापनाने 12 ऑक्टोबरपासून तीन दिवस यज्ज्ञाचे आयोजन केलं आहे. मुस्लिम बांधव आपल्याबाजूने सेवा कार्य करुन त्यात सहभागी झाले आहेत. मुस्लिमांनी मंदिर परिसरात चहा आणि कॉफीचे स्टॉल लावले आहेत. आम्ही हे सर्व मोफत देत आहोत असं मोमीनने सांगितलं.