ब्लॅक सॅटरडे | गेम झोनच्या आगीत 9 मुलांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 4 लाखांची घोषणा

गुजरातमधील राजकोट येथील टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या आगीत आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. तर मृतांमध्ये 9 लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी भरपाईची घोषणा केली आहे.

ब्लॅक सॅटरडे | गेम झोनच्या आगीत 9 मुलांचा होरपळून मृत्यू, मुख्यमंत्र्यांकडून 4 लाखांची घोषणा
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 10:06 PM

राजकोटमधील टीआरपी गेम झोनमध्ये (RTP Game Zone Fire) लागलेल्या आगीमधील मृतांचा आकडा वाढला आहे. आतापर्यंत 24 जणांचा यामध्ये मृत्यू झाला असून यामध्ये 9 मुलांचा समावेश आहे. गुजरातचे गृहमंत्री हर्ष सिंघवी यांनी ही आकडेवारी दिली आहे. उन्हाळ्याची सुट्टी असल्याने या गेम झोनमध्ये लहान मुलांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. मात्र खेळायला बागडायला आलेल्या लहान मुलांना आपला जीव गमवावा लागलाय. या अग्नितांडवाममध्ये संपूर्ण गेम झोन जळून खाक झालं आहे. चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे आजचा शनिवार ब्लॅक सॅटरडे ठरलाय.

मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपयांची भरपाई

राजकोटमधील आगीची दुर्घटना हृदय पिळवटून टाकणारी आहे. या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या लोकांप्रती आणि त्यांच्या कुटुंबियांप्रती मी माझ्या संवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी देवाकडे प्रार्थना करतो. राज्य सरकार मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची भरपाई देणार आहे. अशी घटना पुन्हा होणार नाही याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. या संदर्भात विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करून संपूर्ण प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिली.

दुपारी आग लागल्यानंतर सर्वत्र गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अग्निशामक दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. आतमध्ये किती लोकं आहेत याचा काहीच आकडा त्यांना माहिती नव्हता. आल्यावर त्यांनी बचावकार्याला सुरूवात केली. मात्र या परिसरा वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग वाढत गेली आणि त्यामध्ये संपूर्ण गेम झोन हे जळून खाक झालं.

दरम्यान, या गेम झोनचे मालक युवराज सिंग सोलंकी, मनविजय सिंग सोलंकी हे गेम झोनचे मालक आहेत, तर प्रकाश जैन आणि राहुल राठोड हे गेम झोनचे व्यवस्थापक आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.