Tauktae cyclone | गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळाचं थैमान, मच्छिमारांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडीओ

या चक्रीवादळादरम्यान कोस्ट गार्डच्या एका रेस्क्यू ऑपरेशनचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. (Gujarat Tauktae Cyclone Coast Guard rescue operation) 

Tauktae cyclone | गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळाचं थैमान, मच्छिमारांच्या रेस्क्यू ऑपरेशनचा थरारक व्हिडीओ
Gujrat cyclone
Follow us
| Updated on: May 25, 2021 | 11:50 AM

गुजरात : अरबी समुद्रातील ‘तौत्के’ चक्रीवादळाने महाराष्ट्रासह गुजरातमध्ये प्रचंड नुकसान झालं आहे. महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गसह गुजरातमध्ये या चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. तर गुजरातमध्ये तौत्के चक्रीवादळामुळे 45 जणांचा मृत्यू झाला आहे. नुकतंच या चक्रीवादळादरम्यान कोस्ट गार्डच्या एका रेस्क्यू ऑपरेशनचा एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे. (Gujarat Tauktae Cyclone Coast Guard rescue operation)

रेस्क्यू ऑपरेशनचा एक व्हिडीओ समोर

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातच्या अमरेली या ठिकाणी हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले आहे. गेल्या सोमवारी (17 मे) अमरेलीतील पिपावाव बंदरावर बोटीला वाचवण्यासाठी तब्बल 22 मच्छिमार बांधण्यासाठी गेले होते. मात्र वादळी वाऱ्यामुळे ते मच्छिमार समुद्रात पडले. या घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्डने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.

या दरम्यानचा एक व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. यात कोस्ट गार्डच्या जवानांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून 22 मच्छिमारांची सुखरुप सुटका केली. पिपावाव बंदर ते शियाबेट दरम्यान तब्बल आठ तास हे रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले.

गुजरातमध्ये 45 जणांचा मृत्यू

अरबी समुद्रापासून (Arabian Sea) झालेल्या तौत्के चक्रीवादळामुळे (Tauktae cyclone) गुजरातच्या (Gujarat) सौराष्ट्र जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दीवच्या नागवा बीचसह झफराबाद बंदरावर  त्रास झाला आहे. यात मच्छिमारांच्या सुमारे दीडशे बोटींचे नुकसान झाले. तसेच हजारो मच्छिमारांवर आर्थिक संकट ओढावले आहे. या चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये 45 जणांचा मृत्यू झाला आहे.

बोटींचे प्रचंड नुकसान 

झाफराबाद कोळी समाजातील बोट असोसिएशनचे प्रमुख हमीर सोलंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, या बंदरात जवळपास 500 बोटी आहेत. चक्रीवादळाचा इशारा मिळाल्यानंतर त्या बोटी बांधण्यात आल्या. पण हे वादळ इतके भयानक होते की अनेक बोटींचे नुकसान झाले. यातील 150 बोटी बुडल्या. तर काही बोटींच्या अक्षरश: सांगाडे झाले आहे. (Gujarat Tauktae Cyclone Coast Guard rescue operation)

संबंधित बातम्या :

Video : तौत्के चक्रीवादळाच्या तांडवातून वाचलेले ‘मृत्यूंजय’! 24 तासापेक्षा अधिक काळ समुद्रात काढल्यानंतर वाचले प्राण

Weather update : मान्सूनची वेगाने वाटचाल, तीन दिवसात अंदमानात धडकणार!

VIDEO | सोसाट्याच्या वाऱ्याने झाड घरावर पडलं, जिगरबाज आजोबांनी घाव झेलत नातवाला वाचवलं

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.