अनीस बज्मींनी उलघडला आपला यशाचा प्रवास; गुजराती भाषेचा केला गौरव
आजच्या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गुजराती भाषा, राज्य आणि संस्कृतीविषयी गौरवोद्गगार काढले.
अहमदाबादः मागील तीन दिवसांपासून गुजरातमधील अहमदाबादमध्ये प्रवासी गुजराती पर्व-2022 सुरू आहे. त्यानिमित्त अनेक दिग्गज या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहेत. आजच्या कार्यक्रमात चित्रपट दिग्दर्शक (Film Director) अनीस बज्मी ( Anis Bajmi) सहभागी झाले होते. यावेळी बोलताना त्यांना सांगितले की, माझी कमजोरी ही आहे की मी कोणतीही भाषा (language) पटकन शिकू शकत नाही, परंतू गुजराती भाषा मला लवकर शिकता येते असंही त्यांनी यावेळी मत व्यक्त केले. यावेळी त्यांना गुजराती भाषेविषयी प्रचंड कौतूक केले.
अहमदाबादमधील तीन दिवसीय प्रवासी गुजराती पर्व-2022 चा रविवार हा दुसरा दिवस आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यापासून ते चित्रपट जगतातील अनेक दिग्गज या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
आजच्या कार्यक्रमात चित्रपटाचे दिग्दर्शक अनीस बज्मी सहभागी झाले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या मनोगतामध्ये गुजराती भाषा, राज्य आणि संस्कृतीविषयी गौरवोद्गगार काढले.
यावेळी ते म्हणाले की, जेव्हा माझे लग्न झाले, तेव्हा मला माझ्या पत्नीबरोबर गुजराती आणि हिंदी भाषेत संवाद साधवा लागत होता. मात्र मला गुजराती भाषा येत नव्हती. त्यानंतर मात्र मी गुजराती बोलायला शिकल्यामुळे मला चांगला संवाद साधता येऊ लागला असंही त्यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी सांगितले की, माझी मुलंही आता गुजरातीमध्ये बोलतात. माझे सर्व नातेवाईक गुजरातचे असल्यामुळे आता याच भाषेतून संवाद साधणे चांगले झाले.
मला कोणतीही भाषा लवकर शिकता येत नाही तिच खरी माझी कमजोरी आहे. मात्र गुजराती भाषा मला लवकर शिकता आली असंही त्यांनी सांगितले. त्यासाठी मला देवाचे आभार मानले पाहिजे असंही त्यांनी नम्र पणे सांगितले.