नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) काँग्रेसला (Congress) मानहाणीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला रोखण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली. तर पंजाबमधून आम आदमी पक्षानं (Aam Aadami Party) काँग्रेसला अक्षरश: झाडून बाजूला केलं. या पराभवानंतर काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत अनेक खलबतं झडली. सोनिया गांधींनी सर्व अधिकारपदावरुन बाजूला होण्याची तयारीही दर्शवली. मात्र, पुन्हा एकदा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वातच पुढे जाण्याचा निर्णय घेण्यात आला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस आता गुजरात विधानसभा निवडणुकीच्या (Gujrat Assembly Election) तयारीला लागलीय. पाच राज्यातील पराभव बाजूला करत गुजरातवर लक्ष केंद्रित करण्याची तयारी केलीय. गुजरातमध्ये भाजप आणि आपला रोखण्यासाठी काँग्रेसनं खास रणनिती आखल्याची माहिती मिळतेय.
काँग्रेसचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी गुजरातेतील काँग्रेस नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीत भाजप आणि आपचा सामना करण्यासाठी विशेष रणनिती आखण्यात आलीय. त्याचबरोबर भाजपसह आता आप विरोधात आक्रमक प्रचार करण्यावर सहमती झाली. सभापती आणि विधिमंडळ पक्षनेते यांची निवड नुकतीच करण्यात आलीय. अशावेळी काँग्रेस पुन्हा एकदा संघटन वाढीसाठी प्रयत्न करेल आणि लोकांना भाजप आणि आपमध्ये जाण्यापासून रोखण्यासाठी काम करणार आहे. अनेक राज्यात पक्षांतरामुळं काँग्रेसनं मोठं नुकसान झालं. त्यामुळे आता पक्षानेही आपल्या चुकांमधून शिकण्यास सुरुवात केलीय. या बैठकीत राहुल गांधी यांना 6 एप्रिल रोजी साबरमती आश्रमापासून सुरु होणाऱ्या यात्रेत सहभागी बोण्यासाठी निमंत्रण देण्यात आलं. या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेस भाजपविरोधी वातावरण तयार करण्यासाठी काम करेल तर आपचं वातावरण तयार होऊ नये म्हणून काम करणार आहे.
आम आदमी की जिंदगी महंगाई के दलदल में फंसकर लगातार मुश्किल होती जा रही है। जनता को तो फर्क पड़ रहा है, लेकिन भाजपा को नहीं।#भाजपा_आयी_महंगाई_लायी pic.twitter.com/huvaxPBu4u
— Congress (@INCIndia) March 22, 2022
काँग्रेस दिल्ली आणि पंजाबमधील आपले नेते आणि कार्यकर्त्यांना गुजरातमध्ये पाठवणार आहे. हे नेते आपच्या चुकांचा पाढा गुजरातमध्ये वाचणार आहेत. यासाठी व्हिडीओ क्लिप, घोषणांचा वापर केला जाईल. आप ही भाजपची बी टीम असल्याचा प्रचार काँग्रेस गुजरातच्या निवडणुकीत करेल. तसंच गुजरातमधील जनतेच्या प्रश्नांची यादी आतापासूनच तयार करण्याच्या सूचना गुजरातमधील काँग्रेस नेत्यांना करण्यात आल्या आहेत.
गुजरातमध्ये भाजपला अधिक आक्रमकपणे घेरण्याचा निर्णय काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आला. तसंच काँग्रेस नेते सुरुवातीला आदिवासींच्या पाण्याच्या प्रश्न उपस्थित करतील, त्याची तयारी आतापासूनच सुरु झालीय. तसंच नदी जोड प्रकल्पा विरोध करणाऱ्या आदिवासींना काँग्रेस भक्कमपणे पाठिंबा देईल. भाजपविरोधातील सततचा पराभव आणि पंजाबमध्ये आपच्या उदयानंतर काँग्रेसला आता दुहेरी रणनितीवर काम करावं लागत आहे. त्या दृष्टीनं वाटचार करण्यासाठी काँग्रेस आता सज्ज होत असल्याचं आजच्या बैठकीवरुन दिसून आलं.
इतर बातम्या :