मोठी बातमी : TRP गेम झोनमध्ये अग्नितांडव, 24 जणांचा मृत्यू, लहान मुलांचं काय झालं?

Gujrat Rakjot fire in trp game zone : गुजरातमध्ये टीआरपी गेम झोनमध्ये मोठी आग लागली आहे. या आगीमध्ये आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. हा आकडा वाढला जाईल अशी माहिती अग्निशामक दलाच्या एक अधिकाऱ्याने माध्यमांसोबत बोलताना दिली आहे.

मोठी बातमी : TRP गेम झोनमध्ये अग्नितांडव, 24 जणांचा मृत्यू, लहान मुलांचं काय झालं?
Follow us
| Updated on: May 25, 2024 | 8:51 PM

डोंबिवलीमधील स्फोटाच्या घटनेनंतर आता गुजरात राज्यामधील राजकोट येथील टीआरपी या गेमझोनमध्ये मोठी आग लागलीये. या आगीमध्ये एकून 22 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या गेम झोनपासून एक किलोमीटर परिसरामध्ये धुर पसरला आहे. शाळकरी लहान मुलांना सुट्टी असल्याने त्यांची या ठिकाणी गर्दी होती, ही घटना घडली त्यावेळी लहान मुलेही उपस्थित होतीत. या मुलांचं काय झालं याबाबत कोणतीही माहिती आतापर्यंत समोर आलेली नाही. एकंदरित अग्नितांडव पाहता मृत्यूचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. या आगीचे सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर आले आहे आहेत.

राजकोटचा हा गेम झोन आगीत पूर्णपणे जळून खाक झाला आहे. मृतांची ओळख पटवणं अवघड झालं आहे, कारण आगीत जळल्याने त्यांचे चेहरे ओळखू येत नाहीयेत. गेम झोनच्या मालकाला अटक करण्यात आल्याची माहिती समजत आहे. युवराज सिंग सोलंकी, मनविजय सिंग सोलंकी हे गेम झोनचे मालक आहेत, तर प्रकाश जैन आणि राहुल राठोड हे गेम झोनचे व्यवस्थापक आहेत.

राजकोटच्या गेम झोनमध्ये लागलेल्या आगीच्या घटनेवर महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर उपचार सुरू आहेत, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केलं आहे.

नेमकी ही आग कशामुळे लागली याबाबतची कोणतीही माहिती समोर आलेली नाही. गेम झोनमध्ये आग विझवण्यात अडचणी येत आहेत. जोरदार वारेही वाहत आहेत. त्यामुळे आग विझवण्यात अडचण येत आहे, असं ग्निशमन दलाचे अधिकारी आयव्ही खेर यांनी सांगितलं.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.