काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार, गुलाम नबी आझाद यांचा दावा

| Updated on: Mar 20, 2022 | 4:51 PM

आझाद म्हणाले की, महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते, असं माझं मत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये जे काही झालं त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे. यात सर्व हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुसलमान, डोगरा समाज प्रभावित झाला.

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनासाठी पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार, गुलाम नबी आझाद यांचा दावा
गुलाम नबी आझाद, ज्येष्ठ काँग्रेस नेते
Image Credit source: TV9
Follow us on

नवी दिल्ली : ‘द काश्मिर फाईल्स’ (The Kashmir Files) या चित्रपटावरुन सध्या देशभरात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. अशावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) हे दोन दिवसीय जम्मू दौऱ्यावर आहेत. यावेळी बोलताना आझाद म्हणाले की, महात्मा गांधी हे सर्वात मोठे हिंदू आणि धर्मनिरपेक्ष होते, असं माझं मत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu Kashmir) जे काही झालं त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार आहे. यात सर्व हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुसलमान, डोगरा समाज प्रभावित झाला. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री गुलान नबी आझाद दोन दिवसांच्या जम्मू काश्मिर दौऱ्यावर आहेत. पक्षाच्या नेत्यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं. त्यावेळी माजी मंत्री वकार रसूल, मनोहर लाल, गारू राम, ठाकूर जय सिंह आदी नेते उपस्थित होते.

‘कोणत्याही राजकीय पक्षाला माफ करणार नाही’

राजकीय पक्ष धर्म, जात आणि अन्य गोष्टींवरुन चोविस तास विभाजनाचं विष पसरवू शकतात. मी कोणत्याही पक्षाला माफ करु शकत नाही. समाजाने एकत्र राहिलं पाहिजे. जाती, धर्माची पर्वा न करता सर्वांना न्याय मिळायला हवा, असं आझाद म्हणाले. दरम्यान, आझाद यांनी पक्षाच्या सर्व नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले आहेत. आझाद मागील काही काळापासून जम्मू-काश्मिरमध्ये चांगलेच सक्रीय झाले आहेत. आपल्या दौऱ्यात ते विविध प्रदेशातील गावांमध्ये जात लोकांशी संवाद साधत आहेत, त्यांना आपल्याशी जोडण्याचा आझाद यांचा प्रयत्न आहे.

‘पक्षाला पुन्हा मजबूत करण्यावर भर’

गुलाम नबी आझाद यांनी पक्षाची राष्ट्रीय पातळीवरील पिछेहाट सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासोबत चर्चा केली होती. जवळपास दीड तासापेक्षा अधिक काळ चाललेल्या या बैठकीत आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पक्षाला पुन्हा एकदा मजबूत करण्यावर भर देण्यात आला.

संघटनेत मोठे बदल गरजेचे – आझाद

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सध्या अंतर्गत गटबाजी आणि नाराजी पाहायला मिळतेय. अळावेळी गुलाम नबी आझाद म्हणाले की, पक्षाचा अध्यक्ष कोण बनणार हे अध्यक्षपद निवडणुकीतच ठरेल आणि त्याचा निर्णय कार्यकर्ते करतील. सध्या अध्यक्षपद रिक्त नाही. काँग्रेस कार्यकारिणी बैठकीत सोनिया यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. पण आम्ही सर्वांनी मिळून त्यांना अध्यक्षपदी कायम राहण्यास सांगितले. फक्त संघटनेत महत्वाचे बदल गरजेचे असल्याचं आझाद यावेळी म्हणाले.

इतर बातम्या :

काही चुकांमुळे Congress कमकुवत झालीय, सुशीलकुमार शिंदे यांचा पक्षाला आत्मचिंतन करण्याचा सल्ला

SP MLC Candidates: सपाचा पुन्हा उत्तर प्रदेशात MY फॉर्म्यूला, सब कुछ यादव, दाखवायला दोन मुस्लीम?