नवी दिल्ली, दि.26 जानेवारी 2024 | ज्ञानवापी मशीद संदर्भात भारतीय पुरातत्व विभागाचा (ASI) रिपोर्ट आला आहे. या अहवालातून ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी मंदिरच होते. मंदिर पाडून मशीद उभारण्यात आली आल्याचे स्पष्ट झाले आहे. मंदिर असल्याचे 32 पेक्षा जास्त पुरावे मिळाले आहेत. 32 शिलालेखमधून हिंदू मंदिर असल्याचे स्पष्ट होत आहे. हा अहवाल दोन्ही पक्षांना एएसआयने दिला आहे. मशीद बांधताना हिंदू मंदिरातील खंबे थोड्याप्रमाणात बदलण्यात आल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे. या अहवालातील काही माहिती पुढे आली आहे. त्यामुळे अयोध्या निकालाची आठवण पुन्हा ताजी झाली आहे.
ज्ञानवापीत मंदिर असताना एक मोठा केंद्रीय कक्ष होता. तसेच उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम विभागात एक एक खोली होती. त्यातील उत्तर, दक्षिण आणि पश्चिम विभागातील अवशेष मिळाले. परंतु पूर्व विभागाचे अवशेष अजून मिळाले नाही. मंदिराचे जे केंद्रीय कक्ष होते ते आता मशिदीचे केंद्रीय कक्ष आहे. मंदिराचा मुख्य प्रवेशद्वार पश्चिमेकडून होता. हे प्रवेशद्वार दगडांनी बंद करण्यात आला आहे. मशीद बनवताना मंदिराच्या अनेक खुणा मिटण्याचा प्रयत्न झाला असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
ज्ञानवापी मशिदीच्या ठिकाणी 32 शिलालेख सापडले. त्यात देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिपी मिळाली आहे. त्यावर जनार्दन, रुद्र आणि उमेश्वर असे देवांचे नाव मिळाले. महा-मुक्तिमंडप यासारखे तीन शब्द शिलालेखांमध्ये मिळाले आहे. मंदिराचे अनेक शिलालेख मशीद बनवताना वापरल्याचे अहवालात म्हटले आहे.