‘ज्ञानवापी’ प्रकरणाचा आज निकाल; वाराणसीत संचारबंदी; मशिदीचा वाद नेमका आहे तरी काय?
सर्वोच्च न्यायालयाने ज्ञानवापी प्रकरणात आदेश देताना वाराणसीच्या जिल्हा न्यायालयाला आधी सुनावणीच्या आधारे या याचिकेच्या गुणवत्तेवर निर्णय घेण्यास सांगितले होते. या संदर्भात न्यायालय सोमवारी म्हणजेच १२ सप्टेंबर रोजी निकाल देणार आहे.
वाराणसीः मागील काही दिवसापूर्वी ज्ञानवापी मशिदीचा वाद (Controversy of Gnanavapi Masjid) उफाळून आला होता, त्यावेळी हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही समाजाकडून न्यायालयात याचिका (Petition to court) दाखल करण्यात आल्या होत्या. वाराणसीच्या ज्ञानवापी मशिद संकुलात असलेल्या माँ शृंगार गौरीचे नियमित दर्शन आणि पूजेची मागणी करणारी हिंदू समाजाच्या बाजूने याचिका दाखल केली गेली होती, ती याचिका कायम ठेवण्या योग्य आहे की नाही त्यावरच वाराणसीचे जिल्हा न्यायालय (Varanasi District Court Resut) आज 12 सप्टेंबर रोजी निकाल देणार आहे. मागील काही दिवसापूर्वी हा वाद प्रचंड उफाळून आला होता, त्या धर्तीवर वाराणसी शहरात कलम 144 लागू करण्यात आले आहे. वाराणसीमध्ये ज्या भागात हिंदू-मुस्लीम समाज आहे, त्या भागात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.
ज्ञानवापीबद्दल न्यायालय आज महत्त्वपूर्ण निर्णय देणार असल्याने वाराणसीचे पोलीस आयुक्त ए. ज्ञानवापी-श्रृंगार गौरी यांनी सांगितले की, खबरदारीचा उपाय म्हणून वाराणसी आयुक्तालयात कलम 144 लागू करण्यात आले आहे.
या धर्तीवर वाराणसीतील पोलीस अधिकारी हिंदू आणि मुस्लिम नेत्यांबरोबर संवाद साधत कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी काळजी घेत आहेत.
जिल्ह्याच्या सीमेवर कडेकोट बंदोबस्त
ज्ञानवापीच मुद्दा साऱ्या देशभर गाजला होता, त्यामुळे शहरात आणि शहराबाहेरही प्रचंड मोठा पोलीस फौजफाटा तैनात केला गेला आहे. संवेदनशील भागात पोलिसांसकडून पोलीस गस्त घालत असून शहरातील प्रत्येक गल्लीत पोलीस तैनात केले गेले असून कलम 144 लागू केले गेले आहे. तर जिल्ह्यातील संवेदनशील भागातही प्रचंड मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
ज्या प्रकारे शहरात पोलिसांकडून लक्ष ठेवण्यात आले आहे त्याचप्रमाणे सोशल मीडियावरही पोलिसांनी बारीक लक्ष ठेवले आहे. कोणत्याही अफवांना बळी पडू नका आणि कोणत्याही अफवा कोणीही पसरवू नका अशा सूचना पोलिसांकडूनही दिल्या गेल्या आहेत.
खटला कायम ठेवायचा की नाही
वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश ए.के. विश्वेश यांच्या न्यायालयात सुरू असलेला ज्ञानवापीचा खटला कायम ठेवायचा की नाही यावरील हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला आहे. मात्र याबाबतचा निर्णय न्यायालयाकडून राखून ठेवण्यात आला आहे. त्याबाबतच 12 सप्टेंबर रोजी न्यायालय निकाल देणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
हिंदू देवतांची पूजा करण्याची मागणी
ज्ञानवापी मशिदी बाहेरील भिंतीवर असलेल्या हिंदू देवतांच्या दैनंदिन पूजा करण्याचे आदेश देण्यात यावेत या मागणीसाठी दिल्लीतील राखी सिंग आणि वाराणसीतील चार महिलांनी गेल्या वर्षी न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यानंतर मात्र दिवाणी न्यायाधीशांच्या आदेशानुसार मे महिन्यामध्ये ज्ञानवापी परिसराचे व्हिडिओग्राफी सर्वेक्षण करण्यात आले होते.
प्रार्थना स्थळ कायदा, 1991 चे उल्लंघन
ज्ञानवापी बद्दल ज्या प्रमाणे हिंदू समाजातील काही व्यक्तींकडून याचिका दाखल केली होती, त्याच प्रमाणे मुस्लिम समाजाच्या बाजूनेही सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून या सर्वेक्षणाला स्थगिती देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यावेळी या याचिका प्रार्थनास्थळ कायदा, 1991 चे उल्लंघन करत असल्याचे म्हणण्यात आले होते.
न्यायालयाकडून व्हिडिओग्राफी सर्वेक्षणाला स्थगिती देण्यास नकार देण्यात आला असला तरी हा खटला जिल्हा न्यायाधीशांच्या न्यायालयात वर्ग करण्याचे आदेश दिले गेले आहेत.
ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल
ज्ञानवापी सर्वेक्षणाचा अहवाल गेल्या 19 मे रोजी जिल्हा न्यायालयात सादर करण्यात आला होते, त्यानंतर सर्वेक्षणादरम्यान, हिंदू बाजूने ज्ञानवापी मशिदीच्या वाजू खान्यात शिवलिंग सापडल्याचा दावा करण्यात आला होता, तर मुस्लिम बाजूने ते कारंजे असल्याचे सांगण्यात आले होते.
मुस्लिम बाजूने खूप जुनी कागदपत्रे सादर
प्रार्थनास्थळ कायदा, 1991 च्या विरोधात मुस्लिम बाजूने हे प्रकरण सुनावणीसाठी ठेवण्यायोग्य नसल्याचे सांगण्यात आले होते. यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर प्रथम सुनावणी घेण्याचे जिल्हा न्यायाधीशांनी ठरवण्यात आले होते.
या प्रकरणी दोन्ही पक्षांचा युक्तिवाद पूर्ण झाला असून हिंदू बाजूने असा दावा केला आहे की मुस्लिम समाजाच्या बाजूने खूप जुनी कागदपत्रे सादर केली गेली आहेत.
ज्याचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाही. मात्र, हे प्रकरण कायम ठेवण्यायोग्य आहे की नाही, यावर मात्र आज निर्णय देण्यात येणार आहे.