Gyanvapi : ज्ञानवापीवर आज निर्णय! युक्तिवाद पूर्ण, 45 मिनिटांच्या युक्तिवादात नेमकं काय घडलं?

या प्रकरणातील माजी कोर्टच कमिश्नर अजय मिश्रा यांना सुनावणीसाठी कोर्टात जाण्यापासून रोखण्यात आलं होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता

Gyanvapi : ज्ञानवापीवर आज निर्णय! युक्तिवाद पूर्ण, 45 मिनिटांच्या युक्तिवादात नेमकं काय घडलं?
ज्ञानवापी मशीदीप्रकरणी पुढील सुनावणी 26 मे रोजी
Follow us
| Updated on: May 24, 2022 | 7:55 AM

वाराणसी : ज्ञानवापीवर आज निर्णय येण्याची शक्यता आहे. संपूर्ण देशाचे लक्ष असलेल्या ज्ञानवापी (Gyanvapi)मशीद प्रकरणातील सर्वेचा अहवाल वाराणसी सोमवारी जिल्हा कोर्टात (Varanasi district court)सादर करण्यात आला होता. दोन्ही पक्षकरांनी एकामागून एक आपली बाजू मांडली होती. जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांच्या कोर्टात सुमारे 45 मिनिटे यावर युक्तीवाद सुरु होता. या प्रकरणातील निर्णय आज (Judgment)येणार आहे. या सुनावणीच्या वेळी दोन्ही पक्षकारांचे 19 वकील आणि चार याचिकाकर्ते कोर्टरुममध्ये हजर होते. ज्ञानवापी प्रकरणाशी संबंधित सर्वे अहवाल शनिवारीच कोर्टाला सादर करण्यात आला होता. मात्र सुप्रीम कोर्टाने त्यावेळी निर्णय सुनावू नये, असे सांगितले होते. त्यानंतर निर्णय देण्यास मंजुरी देण्यात आली. याबोरबरच सेशन कोर्टातून हे प्रकरण जिल्हा कोर्टाकडे सोपवण्यात यावे असे आदेशही देण्यात आले होते.

कोणत्या मुद्द्यांवर सुनावणी?

प्लेसेस ऑफ वरशिप एक्टच्या कलम 3 आणि 4 वर सुनावणी झाली. त्याबाबत आज पुढील कारवाई सुरु राहणार आहे, असं या प्रकरणात वादी असलेल्या विष्णू जैन यांनी सांगितलं होतं. जिल्हा न्यायाधीशांनी सर्व पक्षकारांच्या विनंती अर्जाबाबत माहिती घेतली. मुस्लीम पक्षकारांनी दाखल करण्यात आलेल्या विनंती अर्जाबाबतही कोर्टाने ऐकून घेतले. कमीशनने दिलेल्या अहवालाबाबतही यावेळी माहिती घेतली.

या प्रकरणात प्लेसेज ऑफ वर्शिप एक्ट लागू होत नाही असा हिंदू पक्षकारांचा दावा आहे. 1937 मध्ये दीन मोहम्मद यांच्या एका खटल्यात 15 जणांनी या ठिकाणी 1942 पर्यंत पूजा होत असल्याची साक्ष दिली होती. त्यामुळे हा एक्ट या प्रकरणात प्रभावी होणार नाही, अशी हिंदू पक्षकरांची भूमिका आहे.

हे सुद्धा वाचा

कोर्टाबाहेर मोठी सुरक्षाव्यवस्था

या प्रकरणातील माजी कोर्टच कमिश्नर अजय मिश्रा यांना सुनावणीसाठी कोर्टात जाण्यापासून रोखण्यात आलं होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी, मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. यादीत ज्यांची नावे होती त्यांनाच कोर्टात प्रवेश देण्यात आला होता. कोर्टाबाहेर मोठ्या संख्येने सुरक्षा कर्मचारी तैनात होते. सुनावणीवेळी गर्दी होई नये याची विशेष काळजी घेण्यात आली होती.

उरले फक्त 8 दिवस

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार, या प्रकरणात जिल्हा न्यायाधीशांनी 8 आठवड्यांत सुनावणी पूर्ण करावी, असे आदेश दिले आहेत. तोपर्यंत शिवलिंग सापडलेली जागा सुरक्षित ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच मुस्मांनाही नमाज पढण्यास रोखू नये असेही सांगण्यात आले आहे. नमाजासाठी केवळ 20 जणांची मर्यादाही हटवण्यात आली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.