हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या तरुणाचा मृत्यू! ट्रान्सप्लांट केल्यानंतर अवघ्या 3 दिवसात जीव गमावला
Hair Transplant : 16 सप्टेंबरचा दिवस ठीकठाक गेला. पण 17 सप्टेंबरला अरविंद यांना अस्वस्थ वाटू लागलं. म्हणून ते डॉक्टरकडे गेले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि असह्य वाटत होतं.
हेअर ट्रान्सप्लांट (Hair Transplant) करण्याचं प्रमाण गेल्या काही वर्षांत कमालीचं वाढलंय. अशातच हेअर ट्रान्सप्लांट करण्याच्या विचारात असलेल्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हेअर ट्रान्सप्लांट केलेल्या तरुणाचा संशयास्पदरीत्या मृत्यू झाला आहे. 31 वर्षांच्या एका तरुणानं हेअर ट्रान्सप्लांट सर्जरी (Hair Transplant Surgery) केली होती. त्यानंतर या तरुणाचा 3 दिवसांनी मृत्यू झाला आहे. टाईम्स ऑफ इंडियानं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एनफिलास्टीक शॉक विथ इंटरस्टीअल न्युमोनिया असं या तरुणाच्या मृत्यूचं कारण सांगितलं जात आहे. अहमदाबादच्या मेहसाना इथं ही घटना उघडकीस आली आहे. या मृत्यूप्रकरणी आता पोलिसांकडूनही अधिक तपास केला जातो आहे. पोलिसांनी अधिक माहितीसाठी या तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post Mortem) पाठवला होता. त्यातून या तरुणाचा मृत्यू एनफिलास्टीक शॉक विथ इंटरस्टीअल न्युमोनियामुळे झाल्याचं सांगितलं जातंय.
एनफिलास्टीक शॉक विथ इंटरस्टीअल न्युमोनिया म्हणजे?
अनाफिलाक्सीस होण्याचं मुख्य कारणं हे थेट रोगप्रतिकार शक्तीशी जोडलेलं आहे. अवाजवी प्रमाणात रोगप्रतिकारक रसायनं शरीरात पसरल्यामुळे अनाफिलाक्सिसचा धोका उद्भवतो. यामुळे ब्लड प्रेशर अचानक कमी होतं. त्याचप्रमाणे श्वास घेण्यासाठी त्रास जाणवतो. अनेकदा तर यामुळे अनाफिलास्टीक शॉक येऊन माणूस कोमात जाण्याची किंवा त्यांचा मृत्यू होण्याचीही भीती असते.
हेअर ट्रान्सप्लांटमुळे शॉकची भीती?
हेअर ट्रान्सप्लांटमुळे अनाफिस्कीट शॉक येतो हा असाही प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे. त्यामुळे हा प्रकार थेट हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्यांनाही धास्तावणारा असा ठरतोय. दरम्यान, हेअर ट्रान्सप्लांटमुलेच असा प्रकार झाला आहे, असं थेट दावा करता येत नाही. वेगवेगळ्या प्रकारची औषधं, काही खाद्यपदार्थांची असलेली ऍलर्जी, अनेक गोष्टींबाबतचं दुखणं, किंवा इतर शरीरातील व्यांधींमुळे हा शॉक येऊ शकतो, असंही जाणकार सांगतात.
ट्रान्सप्लांट आणि घटनाक्रम
टाईम्स ऑफ इंडियान दिलेल्या रिपोर्टनुसार, हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतर मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव अरविंद चौधरी असं आहे. अरविंद 31 वर्षांचे होते. विसनगरमध्ये ते एक लायब्ररी चालवायचे. त्यांनी सप्टेंबर 15 रोजी हेअर ट्रान्सप्लांट केलं होतं. मेहसानाच्या जेलरोड येथील एका क्लिनिकमध्ये त्यांनी हेअर ट्रान्सप्लांट केलं. 15 सप्टेंबरला दुपारी चार वाजता त्यांची सर्जरी झाली. त्यानंतर रात्री 10 वाजेपर्यंत ते क्लिनिकमध्ये होते. नंतर त्यांना घरी सोडण्यात आलं. यावेळी अरविंद यांची प्रकृती ठणठणमीत होती.
16 सप्टेंबरचा दिवस ठीकठाक गेला. पण 17 सप्टेंबरला अरविंद यांना अस्वस्थ वाटू लागलं. म्हणून ते डॉक्टरकडे गेले. त्यांना श्वास घ्यायला त्रास होत होता आणि असह्य वाटत होतं. डॉक्टरांनी त्यांना तपासल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिला. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रकृती आणखी खालावल्यानं त्यांना आयसीयूत दाखल केलं. पण 18 तारखेला त्यांनी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
कुटुंबीयांचा आरोप
आता अरविंद चौधरी यांच्या कुटुबीयांनी डॉक्टरांवर गंभीर आरोप केले आहेत. डॉक्टरांच्या दुर्लक्षामुळे अरविंद चौधरी यांचा मृत्यू झाला असल्याचा आरोप करण्यात आला होता. दरम्यान, आता अरविंद यांचा विसेरा राखून ठेवण्यात आला असून पोलिस याप्रकरणी आता अधिक तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
Health Tips : उन्हाळ्याच्या हंगामात शरीराचे तापमान कमी ठेवण्यासाठी या खास टिप्स फाॅलो करा!
Health Tips : रात्री उशिरा जेवण करणं टाळा… ‘या’ त्रासापासून स्वत:चा बचाव करा…