80 वर्ष जुन्या विहिरीची सुरू होती साफसफाई, सापडल्या अशा गोष्टी अख्ख्या गावाला फुटला घाम, पोलीसही हादरले
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, विहिरीची साफसफाई सुरू असताना ग्रामस्थांना जे सापडलं ते पासून त्यांना मोठा धक्का बसला आहे. पोलिसही तातडीनं घटनास्थळी हजर झाले.

अनेकदा आपल्यासोबत अशा काही घटना घडत असतात ज्यामुळे आपलं आयुष्य बदलून जातं.आपण अशा अनेक बातम्या वाचत असतो. एखाद्या जुन्या घरात खजिना सापडला, घराचा मालक मालामाल झाला. अनेकदा एखाद्या जुन्या वास्तुंच्या साफसफाईचं काम सुरू असतं, अशावेळेस त्यामध्ये काही गोष्टी सापडतता. ज्या कधी-कधी आपल्या फायद्याच्या असतात. तर कधी-कधी त्याचा आपल्याला फायदा नसतो, मात्र ऐतिहासिक दृष्टिकोणातून त्या वस्तुंना अनन्यसाधारण महत्त्वं असतं. उदाहरण द्यायचं झाल्यास कधी-कधी जमिनीमध्ये खोदकाम सुरू असतं, अशावेळेस आपल्याला जमिनीखाली काही विशिष्ट प्रकारची नाणी सापडतात. त्या नाण्यांचा आपल्याला काहीही फायदा नसतो. मात्र त्यामुळे काळाच्या उदरात गडप झालेला एखाद्या प्राचीन संस्कृतीचा इतिहास समोर येऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला अशा काही वस्तू सापडल्या तर त्याची माहिती पुरातत्व विभागाला देण्याचं आवाहन करण्यात येतं.
अशीच एक घटना जबलपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. महापालिकेच्या वतीनं उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पाण्याची टंचाई लक्षात घेता एका विहिरीची साफसफाई सुरू होती. साफसफाई सुरू असताना विहिरीत उतरलेल्या सफाई कर्मचाऱ्यांना या विहिरीमध्ये काही धक्कादायक गोष्टी आढळून आल्या आहेत. या गोष्टी पाहून त्यांना देखील मोठा धक्का बसला. कामगारांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. कामगारांनी याची माहिती महापालिका अधिकाऱ्यांना दिली.
या विहिरीमध्ये साफसफाई सुरू असताना, विहिरीचा गाळ काढण्याचं काम सुरू असताना बंदुकीचे काडतूसं, एक गंजलेला हॅन्ड ग्रेनेड आणि काही जुन्या बनावटीचे बॉम्ब आढळून आले आहेत. या घटनेची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस बॉम्ब शोधक आणि नाशक पथकासह घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार या विहिरीमध्ये जी हत्यारं आढळून आली आहेत, ती खूप जुनी आहेत. पोलिसांना या विहिरीमध्ये 40ते 50 काडतूस, एक गजलेला हॅन्ड ग्रेनेड आणि काही बॉम्ब आढळून आले आहेत. ही सर्व हत्यारं या विहिरीत कशी आली याचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.