डुबणाऱ्या बंदराचा सहारा बनले हनुमानजी, पाण्याच्या प्रवाहात रात्रभर मूर्तीला चिपकून बसला
हनुमानजींच्या मूर्तीला चिपकून राहिल्यानं बंदराचे प्राण वाचले, असं काही लोकं सांगू लागलेत.
गाझियाबाद : एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओत बंदर हनुमानजींच्या मूर्तीला चिपकून राहिला. बंदराचं प्राण वाचल्यानं हा चमत्कार मानला जात आहे. बंदर हनुमानजींची पूजा करायला पाण्याच्या प्रवाहात गेला. पाण्याचा प्रवाह जोराचा असल्यानं तिथं फसला, अशी चर्चा आता सुरू झाली. उत्तर प्रदेशच्या गाझियाबादमध्ये एक अनोखं चित्र पाहायला मिळालं. एक खास रिस्कू ऑपरेशन करण्यात आलं. विशेष म्हणजे हे रिस्कू ऑपरेशन कुण्या व्यक्तीचं नसून बंदराचं आहे. ही घटना मुरादनगर येथील गंग नहरात घडली. एक बंदर नहराच्या प्रवाहात पडला. पाण्याच्या प्रवाहासोबत तो वाहत गेला.
पाण्याच्या प्रवाहाबाहेर जाण्याचा बंदरानं प्रयत्न केला. पण, त्यात तो अयशस्वी ठरला. प्रवाहासोबत हा बंदर गंग नहरात पोहचला. तेथे त्याला भगवान शिव आणि हनुमानजींची मूर्ती दिसली. बंदरानं बचावासाठी हनुमानजींच्या मूर्तीची मदत घेतली. बंदर या मूर्तीला पकडून पाण्यात राहिला. परंतु, लोकं आता याला चमत्कार समजत आहेत.
#Ghaziabadशनिवार शाम पानी के तेज बहाव से गंगनहर मुरादनगर में एक बंदर गिर गया था,अपनी जान बचाने के लिए वह गंगनहर के बीच स्थापित हनुमान जी की प्रतिमा का सहारा लेकर रात भर बंदर प्रतिमा से लिपट कर बैठा रहा,सुबह@ghaziabadpolice ने रेस्क्यू कर बन्दर की जान बचाई #Viral @sachingupta787 pic.twitter.com/nDbiGsoLKN
— Sunil Gautam journalist ?? (@Iamsunilgautam_) October 31, 2022
रात्रभर बंदर हनुमानजींच्या मूर्तीला चिपकून राहिला. सकाळी स्थानिकांनी पोलिसांच्या मदतीनं बंदराला प्रवाहाच्या बाहेर काढले. नावेच्या साहाय्यानं बंदराला पाण्याच्या प्रवाहाबाहेर काढण्यात आलं.
हा व्हिडीओ आता सोशल मीडियात व्हायरल झालाय. हनुमानजींच्या मूर्तीला चिपकून राहिल्यानं बंदराचे प्राण वाचले, असं काही लोकं सांगू लागलेत. हनुमानजींची पूजा करण्यासाठी तर बंदर तिथं गेला नसावा, असंही लोकं चर्चा करताहेत.
बंदराच्या बाबतीच हा चमत्कार घडला असावा. बंदर हनुमाजींच्या मूर्तीची पूजा करण्यासाठी गेला असावा. अशा प्रकारचे तर्कवितर्क सुरू झाले आहेत. एकंदरित बंदरानं हनुमानजींच्या मूर्तीला पकडून ठेवल्यामुळं बदराचा जीव वाचला, असं लोकं समजू लागलेत.