AAP : ‘काम की राजनीती’मुळे प्रभावित; अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केल्यानंतर हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया

आम्ही आमच्या पक्षात हरिभाऊ राठोड आणि धनराज वंजारी यांचे स्वागत करतो. यामुळे आमच्या संघटनेला महाराष्ट्रात मदत होईल, असे मत प्रीती शर्मा-मेनन यांनी व्यक्त केले.

AAP : 'काम की राजनीती'मुळे प्रभावित; अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आपमध्ये प्रवेश केल्यानंतर हरिभाऊ राठोड यांची प्रतिक्रिया
अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत हरिभाऊ राठोड, धनराज वंजारींचा आपमध्ये प्रवेशImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Aug 21, 2022 | 3:15 PM

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या कार्याची सर्वदूर प्रशंसा झाली आहे. त्यांच्या ‘काम की राजनीती’मुळे प्रभावित होऊन मी आज आम आदमी पार्टीत सामील झालो आहे, अशी प्रतिक्रिया माजी खासदार तसेच ओबीसी नेते हरिभाऊ राठोड (Haribhau Rathod) यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत त्यांनी आपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी माजी पोलीस अधिकारी धनराज वंजारी यांनीदेखील आपमध्ये प्रवेश केला. महाराष्ट्रातून आपच्या नेत्या प्रीती शर्मा मेनन (Preeti Sharma Menon) उपस्थित होत्या. हरिभाऊ राठोड हे माजी खासदार आहेत, ते बंजारा समाजाचे आणि ओबीसी समाजाचे ज्येष्ठ नेते म्हणून महाराष्ट्रात परिचित आहेत. तर धनराज वंजारी हे माजी पोलीस अधिकारी, विदर्भाचे नेते आहेत. ते वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्षही राहिले होते.

‘सर्वात वेगाने वाढणारा पक्ष’

अरविंद केजरीवालज यांच्या नेतृत्वाखाली, आम आदमी पार्टी हा भारतातील सर्वात वेगाने वाढणारा राजकीय पक्ष आहे. आम्ही आमच्या पक्षात हरिभाऊ राठोड आणि धनराज वंजारी यांचे स्वागत करतो. यामुळे आमच्या संघटनेला महाराष्ट्रात मदत होईल, असे मत प्रीती शर्मा-मेनन यांनी व्यक्त केले.

चांगल्या लोकांना सामील होण्याचे आवाहन

अरविंदजी नेहमी म्हणतात त्याप्रमाणे ‘आप’ म्हणजे स्वच्छ राजकारणासाठी सर्व चांगल्या लोकांचे एकत्र येणे, याशिवाय दुसरे काहीही नाही. मी पक्ष पातळीवरील सर्व चांगल्या लोकांना आमच्यात सामील होण्याचे आवाहन करतो, असे मत आम आदमी पार्टीचे मुंबई प्रभारी अंकुश नारंग यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा

‘विदर्भात पक्षाची बांधणी करण्यासाठी प्रयत्न करेन’

महाराष्ट्र सरकार भ्रष्टाचार, अस्थिरता आणि गरीब विरोधी धोरणांनी ग्रासले आहे. परिवर्तनाची तळमळ आहे, आप लवकरच राज्यातील एक मोठी राजकीय शक्ती म्हणून उदयास येईल, असे मत हरिभाऊ राठोड यांनी व्यक्त केले. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पक्षात स्वीकारल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. संपूर्ण विदर्भात पक्षाची बांधणी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असे आश्वासन धनराज वंजारी यांनी यावेळी दिले.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.