रात्री 8.50 वा. फोन झाला, सुषमा स्वराज यांनी उद्या 1 रुपये फी घेण्यासाठी बोलावलं होतं, हरीश साळवेंना धक्का

हरीश साळवे (Harish Salve) यांचं मंगळवारी रात्रीच 8 वाजून 50 मिनिटांनी सुषमा स्वराज यांच्याशी बोलणं झालं होतं.|

रात्री 8.50 वा. फोन झाला, सुषमा स्वराज यांनी उद्या 1 रुपये फी घेण्यासाठी बोलावलं होतं, हरीश साळवेंना धक्का
Follow us
| Updated on: Aug 07, 2019 | 1:38 AM

नवी दिल्ली : भारताच्या धडाकेबाज माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज (Sushma Swaraj) यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. दिल्लीतील एम्समध्ये त्यांनी (Sushma Swaraj) वयाच्या 67 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या छातीत अचानकपणे दुखू लागल्यानंतर त्यांना तातडीने दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. स्वराज यांना वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. पण अखेर त्यांची झुंज अयशस्वी ठरली.

सुषमा स्वराज यांच्या निधनाने देशवासियांना धक्का बसला आहे. पाक कोठडीतील कुलभूषण जाधव (Kulbushan Jadhav case) यांचा खटला आंतरराष्ट्रीय कोर्टात चालवणारे भारताचे वकील हरीश साळवे (Harish Salve) यांना सर्वाधिक धक्का बसला आहे. कारण हरीश साळवे (Harish Salve) यांचं मंगळवारी रात्रीच 8 वाजून 50 मिनिटांनी सुषमा स्वराज यांच्याशी बोलणं झालं होतं. कुलभूषण जाधव खटल्याची 1 रुपयांची फी उद्या घेऊन जा असं सुषमा म्हणाल्या होत्या, असं साळवे यांनी टाईम्स नाऊला सांगितलं.

सुषमा स्वराज यांच्या पुढाकाराने हरीश साळवे हे कुलभूषण जाधव यांचं प्रकरण आंतरराष्ट्रीय कोर्टात मांडत होते. महत्त्वाचं म्हणजे हरीश साळवे या खटल्यासाठी केवळ 1 रुपये फी घेणार होते. 18 जुलैला जेव्हा कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (आयसीजे) भारताच्या बाजूने निकाल दिला, त्यानंतर हरीश साळवे यांना 1 रुपयाच्या फीबाबत विचारलं होतं. तेव्हा त्यांनी या खटल्यासाठी मिळणारा एक रुपया अजून मिळाला नाही, दिल्लीत गेल्यावर घेईन, सुषमा स्वराज यांच्यासोबतही बोलणं झालंय, असं त्या दिवशी सांगितलं होतं.

दुर्दैवी योगायोग म्हणजे हरीश साळवे यांचं आजच सुषमा स्वराज यांच्याशी याच मुद्द्यावर बोलणं झालं होतं.

पाकिस्तानच्या वकिलावर 20 कोटी रुपये खर्च

कुलभूषण प्रकरणात पाकिस्तानने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयात 2 वकील बदलले. मात्र, भारताचे वकील साळवे या दोघांवरही वरचढ ठरले. विशेष म्हणजे हरिश साळवे यांनी हा खटला लढण्यासाठी आपली फी (शुल्क) म्हणून केवळ 1 रुपया घेतला आहे. दुसरीकडे कुलभूषण यांची शिक्षा कायम रहावी यासाठी पाकिस्तानने आटोकाट प्रयत्न केले. पाकिस्तानने आपल्या वकिलावरच तब्बल 20 कोटी रुपये खर्च केले.

तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी 15 मे 2017 रोजी एक ट्वीट करत साळवे यांनी कुलभूषण जाधव यांचा खटला लढण्यासाठी केवळ 1 रुपये मानधन घेतल्याचं सांगितलं होतं.

कोण आहेत हरीश साळवे?

साळवे सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकील आहेत. ते देशातील सर्वात महागड्या वकिलांपैकी एक आहेत. त्यांची एका दिवसाची फी जवळजवळ 30 लाख रुपये असल्याचेही सांगितले जाते. मात्र, कुलभूषण प्रकरणात त्यांनी केवळ 1 रुपया घेतला. ते 1999 से 2002 पर्यंत देशाचे सॉलिसिटर जनरल देखील होते. त्यांचे वडील एन. के. पी. साळवे काँग्रेसचे माजी खासदार आणि क्रिकेट प्रशासकीय मंडळावर होते. हरिश साळवे यांनी भारताच्यावतीने नेदरलँडमधील हेग येथे असलेल्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात (ICJ) बाजू मांडली. यावेळी त्यांनी पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय कायद्यांचे उघडपणे उल्लंघन केल्याचा मुद्दा जोरकसपणे मांडला.

संबंधित बातम्या 

अजून 1 रुपया मिळाला नाही, दिल्लीत जाऊन घेणार : हरिश साळवे  

खटला कुठेही चालू द्या, पाकिस्तानला कुलभूषण यांना न्याय द्यावाच लागेल : हरिश साळवे    

देशातले सर्वात महागडे वकील हरिश साळवे कोण आहेत?  

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.