जम्मू-काश्मीर, हरियाणा निवडणूकीचे निकाल केव्हा ? पाहा प्रत्येक अपडेट

जम्मू आणि काश्मीरातून कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच निवडणूका पार पाडल्या आहेत. जम्मू आणि काश्मीर आणि हरियाणा या दोन्ही विधानसभाचे निकाल येत्या आठ तारखेला आहेत. या संदर्भातील प्रत्येक अपडेट तुम्हाला येथे पाहायला मिळणार आहे.

जम्मू-काश्मीर, हरियाणा निवडणूकीचे निकाल केव्हा ? पाहा प्रत्येक अपडेट
haryana and j&k election date
Follow us
| Updated on: Oct 06, 2024 | 3:46 PM

जम्मू-काश्मीर, हरियाणा येथे विधानसभा निवडणूकांसाठी नुकतेच मतदान झाले आहे. दोन्ही राज्यात विधानसभा निवडणूकांचे निकाल आठ ऑक्टोबरला येणार आहे. मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरु होणार आहे. सर्वात आधी पोस्टल मतांची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणीची सुरुवात होणार आहे. जम्मू – काश्मीरमध्ये कलम 370 हटविल्यानंतर प्रथमच निवडणूका होत आहेत. त्यामुळे या निवडणूकांना महत्व आले आहे.

8 ऑक्टोबर रोजी विधानसभांचा निकाल

जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणूका पार पडल्या होत्या.एक ऑक्टोबरला शेवटच्या टप्प्याचे मतदान झाले होते. तर हरियाणात विधानसभेसाठी 5 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. मतदानानंतर विविध संस्थाचे एक्झिट पोल देखील जाहीर झाले आहेत. यात दोन्ही राज्यात कोणाचे सरकार येणार याचा अंदाज सांगितला आहे. परंतू हे केवळ अंदाज असून खरे निकाल 8 ऑक्टोबरला लागणार आहेत. त्यामुळे त्यादिवसापर्यंत उत्सुकता ताणली आहे.

येथे पाहा निवडणूक निकालांचे अपडेट

दोन्ही राज्यात 8 ऑक्टोबरला सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरु होणार आहे, पोस्टल बॅलेट मोजणी होणार आहे. याचा वापर दिव्यांग, संरक्षण दले आणि काही सरकारी अधिकारी तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी करतात. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होईल. हरियाणा आणि जम्मू आणि काश्मीर येथे कोणते सरकार येणार याचे चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.टीव्ही 9 चॅनलच्या वेबसाईटवर तुम्हाला सर्व निकालाचे ताजे अपडेट मिळतील.

हरियाणा, जम्मू-कश्मीर विधानसभेच्या जागा

हरियाणा विधानसभेच्या 90 जागांसाठी 5 ऑक्टोबरसाठी मतदान झाले होते. तर जम्मू – काश्मीर विधानसभेच्या 90 जागांसाठी तीन टप्प्यात 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबर रोजी मतदान झाले होते. जम्मू आणि काश्मीरसाठी ही निवडणूक खूप महत्वाची आहे. कारण ऑगस्ट 2019 रोजी काश्मीरचे कलम 370 हटविल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. कलम 370 हटविल्यानंतर तत्कालीन जम्मू आणि कश्मीर राज्यापासून लडाख आणि लेह यांना वेगळे करुन केंद्र शासित प्रदेशात त्याचे रुपांतर करण्यात आले आहे.

कलम 370 हटवल्यानंतरची निवडणूक

जम्मू आणि काश्मीर येथे नॅशनल कॉन्फरन्स आणि कॉंग्रेसने एकत्र निवडणूका लढविल्या आहेत. तर पीपल्स डेमोक्रेटीक पार्टी आणि भाजपाने स्वतंत्र निवडणूक लढली आहे. हरयाणात बीजेपी, कॉंग्रेस आणि आम आदमी पार्टी मुख्य लढत होत आहे. तसेच नॅशनल लोक दल-बहुजन समाज पार्टी (INLD-BSP) आणि जननायक जनता पार्टी (JJP)-आझाद समाज पार्टी (ASP) यांच्या निवडणूक पूर्व आघाडी झालेली आहे.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.