लग्न न झालेल्यांना पेन्शन लागू, मात्र नियम वाचून म्हणाल, “मै तौ कुँवारा सही, टेन्शन सही पण पेन्शन नको”
सरकारने लग्न न झालेल्या व्यक्तींसाठी अनोखी पेन्शन 1 जुलैपासून सुरू केली आहे, परंतू या योजनेसाठी पात्र होण्यासाठीच्या अटी पाहिल्या तर अविवाहीतांना भिक नको पण कुत्रे आवर असे वाटेल...
नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : हरियाणा सरकारने नुकताच लग्न न झालेल्यांना पेन्शन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू या पेन्शनसाठी पात्र होण्यासाठी भरपूर अटी आणि नियमांना पार करावे लागणार आहे. म्हणजेच या अटी पाहिल्या तर रोग बरा पण औषध नको अशी अवस्था आहे. जर या योजनेसाठी खोटी माहीती सादर केल्याचे उघड झाले तरी पेन्शनचा लाभ घेणे महागात पडणार आहे. काय आहेत हे नियम आणि अटी पाहूयात..
हरियाणाच्या मनोहर लाल खट्टर सरकारने लग्न न झालेल्या व्यक्तींसाठी अनोखी पेन्शन 1 जुलैपासून सुरू केली आहे, या पेन्शनमध्ये दर महिन्याला 2750 रुपये मिळणार आहेत. यासंदर्भात हरियाणा सरकारने नोटीफिकेशनही जारी केले आहे. यातील नियम आणि अटी पाहिल्या तर पुरुष आणि महिला्ंना खूपच विचार करावा लागेल.
काय आहेत लग्न न झालेल्यांसाठी अटी
1) जर कोणाचे लग्न झाले नसेल आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असेल तर त्याला योजना लागू नसेल
2) कोणाला लग्नानंतर घटस्फोट मिळाला असेल तर तोही या योजनेतून बाहेर
3) अन्य पेन्शन मिळत असलेल्या व्यक्तीला ही अपात्र ठरविले जाईल
4) जर कोणी पेन्शन लागू झाल्यानंतर त्याचे लग्न जुळले तर त्याने तातडीने सरकारला कळविणे गरजेचे
5) पेन्शनसाठी लग्न न झालेले पात्र असतील म्हणजेच आयुष्यभर कुंवारे राहीले तरच मरेपर्यंत पेन्शन मिळेल
6) जे लाभार्थी सामाजिक न्याय विभाग तसेच सरकारला कळविल्याशिवाय लग्न करेल त्याला सजा होईल
7 ) अशा लोकांकडून संपूर्ण पेन्शनची रक्कम वसुल केली जाईल, 12 टक्के व्याज लावले जाईल
8 ) सामाजिक न्याय विभाग आणि विवाह नोंदणी यांनी दिलेल्या ओळखपत्राला अनुसरुन पेन्शन ओळखपत्र जारी करण्यात येईल
9 ) लाभार्थीचे वय 45 ते 60 वर्षांदरम्यान असायला हवे
10 ) लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न 1.80 लाख रुपयाहून कमी हवे
काय आहे ही योजना
– लाभार्थ्याला त्याचे परिवार ओळखपत्र दर महिन्याच्या 10 तारखे आधी जमा करावे लागेल
– एक पेन्शन आयडी तयार केला जाईल, पेन्शनचे पैसे जारी करण्याआधी लाभार्थ्यांची मंजूरी घेतली जाईल
– दर महिन्याचा सात तारखेला पेन्शन जमा होईल
– पेन्शन अशा विधूर व्यक्तीलाही मिळेल ज्यांचे वार्षिक उत्पन्न तीन लाख आहे.
– लाभार्थ्याचे वय 60 झाल्यावर ही योजना ज्येष्ठ नागरिक योजनेत परिवर्तित होईल
70 हजाराहून अधिक अविवाहीत
हरियाणात अविवाहित लोकांची संख्या 70,687 आहे. त्यातील 5,687 व्यक्ती विधूर आहेत. ज्यांना ही नवीन पेन्शन योजना लागू होईल.ही योजना विधवा स्रियांना मात्र लागू नाही. राज्याची आधीपासूनचे विधवांसाठी अन्य योजना आहे. प्रत्येकाला 2750 रुपये मासिक पेन्शन देण्यासाठी सरकारला वार्षिक 240 कोटींचा भार पडेल. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनमध्ये 250 रुपयांनी वाढ करीत ती मासिक 3000 हजार रुपये करणार आहे.