चंदीगड : हरियाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज (Anil Vij Corona) यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. महत्त्वाचं म्हणजे अनिल विज यांनी गेल्याच महिन्यात चाचणीदरम्यान कोव्हॅक्सिनची (Covaxin) लस घेतली होती. तरीही त्यांना कोरोनाची लागण झाल्याने चिंता वाढली आहे. अनिल विज (Anil Vij Corona) यांनी स्वत: ट्विटरवरुन आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं. याशिवाय संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे. (Haryana Health Minister Anil Vij, who was given a trial dose of a coronavirus vaccine last month, tests positive)
अनिल विज यांनी ट्विट करुन आपल्याला कोरोना झाल्याचं सांगितलं. ते म्हणाले, “माझी कोरोना चाचणी करण्यात आली. माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मी सरकारी रुग्णालाय अंबाला इथं दाखल झालो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करुन घ्यावी”
I have been tested Corona positive. I am admitted in Civil Hospital Ambala Cantt. All those who have come in close contact to me are advised to get themselves tested for corona.
— ANIL VIJ MINISTER HARYANA (@anilvijminister) December 5, 2020
हरियाणाचे आरोग्य मंत्री असलेले अनिल विज यांनी गेल्याच महिन्यात कोरोना लसीची चाचणी स्वत:वर करुन घेतली होती. 20 नोव्हेंबरला त्यांना कोव्हॅक्सिन (Covaxin) लस दिली होती. लसीच्या चाचणीसाठी स्वयंसेवक म्हणून सर्वात आधी मी स्वत:ला लस टोचून घेईन असं त्यांनी यापूर्वीच सांगितलं होतं. त्यानुसार विज यांना लस दिल्यानंतर त्यांना 28 दिवसांनी पुन्हा दुसरी लस दिली जाणार होती. शिवाय डॉक्टर त्यांच्या शरिरातील अँटिबॉडीजही तपासणार होते. ट्रायलदरम्यान अनिल विज यांच्यासह 200 स्वयंसेवकांना कोव्हॅक्सिन लस (Covaxin) दिली होती.
वाचा : कोरोना लस कधी येणार? किंमत काय? सगळ्यात आधी कुणाला टोचणार? कोरोना लशीची A to Z माहिती
हरियाणामध्ये कोरोना संकटात भारत बायोटेक आणि इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) कोव्हॅक्सिन या लसीच्या तिसऱ्या चाचणीला सुरुवात केली होती. ही स्वदेशी लस ICMR च्या मदतीने भारत बायोटेकद्वारे बनवण्यात येत आहे. ही लस 60 टक्के यशस्वी ठरेल असा दावा कंपनीने केला होता. दुसरीकेड WHO ने कोणतीही लस 100 टक्के कोरोना व्हायरससाठी प्रभावी असू शकत नाही असंही म्हटलं आहे.
30 नोव्हेंबरपर्यंत भारताकडे कोरोना लसीचे सर्वाधिक डोस, आतापर्यंत 1.6 अब्ज डोसचा करार!
हरियाणात सध्या कोरोनाचं संकट वाढत आहे. एकट्या हरियाणात आतापर्यंत कोरोनाचे 2.39 लाख रुग्ण आढळले. त्यापैकी 2520 रुग्णांचा मृत्यू झाला तर 2.21 लाख रुग्ण कोरोनामुक्त झाले.
(Haryana Health Minister Anil Vij, who was given a trial dose of a coronavirus vaccine last month, tests positive)
संबंधित बातम्या
दिल्ली सरकार अॅक्शन मोडमध्ये, एक कोटी आरोग्य कर्मचाऱ्यांना टोचणार कोरोनाची लस; नोंदणी सुरू